आदिलाबाद-पुर्णा प्रवासी रेल्वे त्वरीत सुरु करा ; रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्ववराव रामतिर्थकर यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 10 October 2020

आदिलाबाद-पुर्णा प्रवासी रेल्वे त्वरीत सुरु करा ; रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्ववराव रामतिर्थकर यांची मागणी

 



किनवट दि.१० : जिल्ह्याचे मुख्यालयाल असलेल्या नांदेड येथे जाण्यासाठी आदिलाबाद - पुर्णा ही प्रवासी रेल्वे दि.१५ च्या आत सुरु करावी व आदिवासी तालुक्यातील जनतेला दिलासा द्यावा,अशी मागणी किनवट रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्ववराव रामतिर्थकर यांनी निवेदनाद्वारे रेल्वे विभागाकडे नुकतीच केली आहे.


   राज्यात व देशात सध्या अनलॉक ५ सुरू आहे.अशा परिस्थितीत तालुक्यातील नागरिकांना मुंबई सह राज्यातील व देशातील विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी एक ही रेल्वेगाडी उपलब्ध करून देण्यात न आल्याने तालुका रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्ववराव रामतीर्थकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


   राज्यासह देशाच्या विविध ठिकाणी अनेक रेल्वेगाड्या येत्या १५ ऑक्टोबर पासून सुरू होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यातून जाणारी व तालुक्यातील नागरिकांच्या उपयोगाची एक ही रेल्वे गाडी सुरू न झाल्याने नागरिकांना दसरा व दिवाळी सणांमध्ये आपल्या घरी येण्यास खाजगी भाड्याच्या वाहनाच्या हजारो रुपयाचा भुर्दंड उचलावा लागणार आहे. या सोबतच जे रुग्ण रुग्णालयात जातात किंवा कॅन्सर या आजारासह विविध आजारासाठी मुंबई येथे जातात त्यांची अतोनात गैरसोय रेल्वे बंद असल्याने झाली असल्याचे श्री. रामतीर्थकर यांनी सांगितले.


      हिंगोली लोकसभा क्षेत्रा अंतर्गत एकही रेल्वे सुरू झाली नसल्याने खासदार हेमंत पाटील यांनी या बाबत योग्य तो पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा उद्ववराव रामतीर्थकर यांनी व्यक्त केली आहे.  मुंबई ते नागपूर अशी धावणारी नंदीग्राम एक्स्प्रेस जिचा गाडी क्रमांक 11401/02 असा आहे.ही गाडीतरी किमान मुंबई ते किनवट अशी सोडण्यात यावी, अशी मागणी ही श्री.रामतीर्थकर यांनी केली आहे.यामुळे किनवट सह बोधडी, हिमायतनगर, भोकर, उमरखेड, माहूर, मांडवी, ढानकी, मुदखेड सह नांदेड येथून किनवट अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.तसेच ही गाडी सुरू झाली तर नागरिकांना खूप सोईस्कर अशी ही गाडी ठरणार आहे. राज्यात येत्या १५ ऑक्टोबर पासून ज्या रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत त्याच्या आधी नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी सुरू करावी व या भागातील प्रवाशांना दिलासा द्यावा,असा श्री.रामतिर्थकर यांचा आग्रह आहे.

No comments:

Post a Comment

Pages