स्वारातीम विद्यापीठा अंतर्गत १७ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 October 2020

स्वारातीम विद्यापीठा अंतर्गत १७ ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलली..

 


  

 नांदेड प्रतिनिधी:

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर, परीक्षेचे ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा चालू आहेत. आज दि. १६ ऑक्टोबर चा ऑनलाईन व ऑफलाईन पेपर काही तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा केंद्रावर वितरीत करण्यात आलेला नाही. पण अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा त्या-त्या परीक्षा केंद्रावर संपन्न होतील.

दि. १७ ऑक्टोबर रोजीचे सर्व परीक्षाचे पेपर हे पुढे ढकलण्यात आलेले असून त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षाचे पेपर २८ ऑक्टोबर रोजी निर्धारित वेळेनुसार निर्धारित केंद्रावर संपन्न होतील. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविलेले आहे

No comments:

Post a Comment

Pages