प्रतिनिधी ,किनवट -
मूलगा मुलगी भेद नको मुलगी झाली खेद नको
असे म्हणत निराळा तांडा येथील नाईक कुटुंबियांच्या व समस्त गावकऱ्यांच्या वतीने तांड्यात नवरात्र उत्सवाची अनोख्या प्रकारे सुरूवात करण्यात आली.
निराळा तांडा येथील श्री. केवलसिंग फुलसिंग नाईक यांच्या कुटुंबात नात म्हणून मुलगी जन्माला आली त्या नवजात शिशुच बेटी बचाव बेटी पढाओ हा सामाजिक संदेश देत मोठ्या हर्ष उल्हासात गावकऱ्यांचा समवेत स्वागत करण्यात आले.
मिडल न्युजला श्री. केवलसिंग नाईक असे बोलले की, आज रोजी समाजात खालावत जाणारे लिंग गुणोत्तर आणि समाजाचा समतोल राखण्यासाठी स्त्री भ्रूणाचे संरक्षण करणे हे काळाची गरज बनले आहे, कारण स्त्री आणि पुरुष हे निसर्गाचे एक सामान घटक आहेत.स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि लहान मुलीचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने आणि सामाजिक संस्थांनी खूप अभियाने सुरु केली आहेत त्याच अनुषंगाने आज माझ्या परिवाराच्या व माझ्या गावाच्या वतीने “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या संबंधी जनजागृती करून सामाजिक संदेश देणे हे उचित वाटते यावेळी निराळा तांड्या तील समस्त गावकरी समवेत श्री.मनीष बाबुसिंग नाईक हे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment