बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी 1 ते 6 डिसेंबर रोजी देशभरातुन लाखों भीम अनुयायी व जनता
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी येथे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
यावर्षी कोरोना महामारीचे संकट आले आहे ते अद्याप टळले नाही,कोरोनावरची लस अद्याप आलेली नाही. आता दिवाळी नंतर देशातील विविध शहरात कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत सुध्दा रुग्ण संख्येत वाढ होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेवुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतातील तमाम भीम अनुयायांना व जनतेला खालीलप्रमाणे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
1) भारतातील सर्व भीम अनुयायी व जनतेने डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमी येथे न येता,आपल्या स्थानिक ठिकाणी असलेल्या ( उदा.शहर,गाव, वार्ड, परिसर,बुद्ध विहार, स्मारक इत्यादी) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व प्रत्येकाने घरातील फोटोला पुष्पहार अर्पण करुन, विनम्र अभिवादन करावे. या अभिवादनाचे फोटो सोशल मिडियावर, व्हाट्सअॅप ग्रुपवर पाठवावेत.
2) कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून स्थानिक ठिकाणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना, प्रत्येकाने शासनाच्या आदेशानुसार मास्क लावुन, फिजिकल डिस्टंसिंग च्या नियमांचे पालन करावयाचे आहे.
3) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे पोस्टकार्ड डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी या पत्त्यावर पाठवावे.
चैत्यभूमी ची ट्रस्टी या नात्याने भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे निवडक वरिष्ठ पदाधिकारी व समता सैनिक दलाचे 100 निवडक सैनिक यांची पोलिस, प्रशासन यांच्या सोबत व्यवस्थेसाठी नेमणूक करण्यात येणार आहे.
तरी, भीम अनुयायांनी व जनतेने चैत्यभूमीमध्ये न येता, वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या स्थानिक ठिकाणी, घरीच अभिवादन करावे.
No comments:
Post a Comment