तीन दुचाकीच्या अपघातात एक ठार,एक गंभीरजखमी,तर एक जखमी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 24 November 2020

तीन दुचाकीच्या अपघातात एक ठार,एक गंभीरजखमी,तर एक जखमी
किनवट,ता.२४ : तीन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात एक ठार,एक गंभीर,तर एक जखमी झाला.हा अपघात आज(ता.२४)सकाळी ११वाजेच्या सुमारास किनवट-माहूर महामार्गावर शांतीभूमी बौध्द स्मशानभूमी जवळ झाला. याबाबतची अधिक माहिती अशी; शहरातील  रंगवैभव कलेक्शन या कापड दुकानात काम करणारा लोणी(ता. किनवट) येथिल निखिल ब्रम्हाजी गुंजकर (वय २४) हा एम. एच. २६ - बी.के. २४४८ क्रमांकाच्या दुचाकीवरून शेतातून डबलसीट किनवटकडे येत होता, तर टी. एस. ०१ - एफ. ए. २२०९ क्रमांकाची दुचाकी किनवटहून बाहेर जात होती. तीसरी दुचाकी साठेनगरातून किनवट - माहूर महामार्गावर येत होती. या तीनही गाड्यांची विचित्र टक्कर झाली. या अपघातात निखिल गुंजकर हा तरुण जागीच ठार झाला. तर रुद्राक्ष शंकर जल्लावार (वय२२ )रा.साठेनगर ,किनवट याच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला मोठी जखम झाल्याने गंभीर जखमी झाला आहे. समोरुन येणा-या  तेलंगणाच्या आदिलाबाद जिल्ह्यातील इच्चोडा मंडळातील आडेगांव येथील चिटफंडचा कर्मचारी बलविरसिंग ठाकूर (वय ४०) हा किरकोळ जखमी झाला आहे. या घाईगर्दीत तीस-या दुचाकीस्वाराने पोबारा केल्याचे बघ्यांनी सांगितले आहे.

          जखमींवर येथील सानेगुरुजी रुग्णालयात डॉ.अशोक बेलखोडे यांनी उपचार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरली राठोड, पोहेकाँ. आप्पाराव राठोड, पो.ना. एलकधरे, पोकॉ. ज्ञानेश्वर डुकरे यांनी जाऊन घटनेचा पंचनामा केला.

रुद्राक्ष जल्लावार गंभीर असल्याने त्यास पुढील  उपचारासाठी आदिलाबाद किंवा नांदेड येथिल जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्याच्या हालचाली सुरु होत्या.

No comments:

Post a Comment

Pages