आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तीपत्र; कार्यकारीणीत युवकांना संधी
किनवट प्रतिनिधी
... खासदार प्रताप पाटील चिखलीकर व आमदार भीमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अॅड किशोर देशमुख यांच्या अनुमतीने भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार यांनी किनवट शहराची कार्यकारीणी जाहीर केली. आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शहर कार्यकारणीस नियुक्तीपत्र देण्यात आले.
शहर सरचिटणीसपदी विश्वास कोल्हारीकर, उपाध्यक्षपदी आकाश भंडारे, राहूल दारगुलवार, राजेंद्र भातनासे, सचिव-जयकुमार वर्मा, कोषाध्यक्ष- नितिन चाडावार, सोशल मिडीया प्रमुख-गौरव इटकेपेल्लीवार, भाजयुमो शहराध्यक्ष कृष्णा बासटवार, सरचिटणी वैभव सिरमनवार, उपाध्यक्ष दिनेश नगरुलवार, शुभम हसबे, दिव्यांग सेल प्रमुख- लक्ष्मण बोलेनवार, व्यापारी आघाडी अध्यक्ष आशिष कंचर्लावार अशी कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.
यावेळी आ.भीमराव केराम यांनी नवनियुक्त पदाधिकायांना नियुक्तीपत्र देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, न.प.उपाध्यक्ष अजय चाडावार, अनिल तिरमनवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष उमाकांत कहाळे, पं.स.सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, बांधकाम सभापती व्यंकट नेम्मानीवार, नरेंद्र सिरमनवार, स्वागत आयनेनीवार, सतीश बिराजदार, भाजयुमो तालुका सरचिटणीस कृष्णा पाटील, भाजयुमो ता.उपाध्यक्ष नचिकेत नेम्मानीवार, सुरेश साकपेल्लीवार, सुभाषबाबू नायक राठोड, पं.स.सदस्य निळकंठ कातले, जितेंद्र कुलसंगे, लतीफ शेख, बबलू नाईक, फजल चव्हाण, आ.भीमराव केराम यांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमते, संतोष मरसकोल्हे, पिंटु गिनगुले यांचेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment