आजही खपवल्या जातात त्या उष्टावली भ्रामक प्रथा माणसाला जनावरं करण्यासाठीच.२१व्या शतकातील आय.टी युगात कोण करत शोषण त्यांचं आणि का?या साऱ्या शोषणकारी व्यवस्थेच्या जिभेला स्त्रीच का पचनी पडावी आणि विशेषतः करून सामाजिक मागासलेल्या,दलित,पीडित,भटक्या,गोरगरीबांच्याच. त्या आजही खितपत आहेत,परंपरेने माथी मारलेलं असहाय वेदनेचं डोईजड ओझं घेऊनच.एकीकडं माहिती तंत्रज्ञानाच्या जाळ्यांनी जग इतकं गुंतलं की, माहितीचा स्फोट होईल अशी भीती आज इंटरनेटच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. भारतातील परिस्थिती आजही शंभर दीडशे वर्षाच्या रूढी परंपरेला चिटकून आहे.रोज रोज इंटरनेटचे जाळं व्यापक आणि गतिमान होत असताना मात्र भारतीय समाजव्यवस्थेतील स्त्रीप्रश्नाचं जाळं अजूनही तसेच आहे.घराघरात इंटरनेटच जाळं पसरलं पण घरातील स्त्रियांच्या डोक्यातील जटाधारी प्रथेच जाळं सोडवण्यात आम्ही पुर्णतः अपयशी ठरलो.अशी कित्येक गाव,घर,महिला,बालके आहेत ज्यांच्यात आजही व्यवस्थेने थापून दिलेल्या बेगड्या परंपरा आजही खुशाल नांदत आहेत.
या संदर्भात माणसात विज्ञान,विवेक जागा व्हावा त्याला सत्य,असत्याची चिकित्सा करता यावी यासाठी विषमसंस्कृती,रूढी,परंपरा,अंधश्रद्धा,बुवाबाजी यांचा कडाडून विरोध केला त्या शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या कार्याची किती नितांत गरज होती याचा प्रत्यय आज क्षणाक्षणाला येऊ लागतो.आज त्यांच्या विचारांना घराघरात पोहचवण्यासाठी अंनिसचे वारसदार आपला वसा पुढे चालवत आहेत.त्यामध्ये जटधारी महिलांच्या जीवनात परिवर्तनाची नांदी घालून खुळचट प्रथांपासून महिलांची मुक्ती करणाऱ्या नावांमध्ये महत्वाचे नाव म्हणजे अंनिस योद्धया नंदिनी जाधव होय.ज्या चळवळीने विवेकाचा जागर करून खुळचट अंधश्रद्धांना जेरबंद केले अशा सर्वश्रुत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्या पुणे जिल्हाकार्याध्यक्षा आहेत.नंदिनीताई जाधव अभ्यासू व्यक्तिमत्व असून आधुनिक विचारांच्या ,विवेक,विज्ञान,समता, बंधुत्व,न्याय,यांच्या पाईक आहेत.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला वाहून घेतलं अशा वास्तविक कर्तबगार, रणरागिनीची समाजव्यवस्थेतील कार्यबांधणी महत्वपूर्ण आहे.ज्याप्रकारे देवदासी,कौमार्य चाचणी,अशा इतरही प्रथा आपल्या समाजात जीवंत आहेत.याच वर्तुळातील एक प्रथा म्हणजे जटधारी महिला. या प्रथेच्या निर्मूलनासाठी नंदिनीताई जाधव वाडी, वस्त्या, पासून ते तळागाळातील माहिलपर्यंत पोहचून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणत आहेत. योग्य समुपदेशन ,अंधश्रद्धा,बुवाबाजी,यासमान भ्रामक संकल्पनातू बाहेर काढत असताना वेगवेगळे अनुभव नंदिनीताईस येत आहेत. दहा- दहा,पंधरा-पंधरा,कोणी सात ,तर कोणी तीन वर्षांपासून जट वाढवलेल्या महिलांचे जट स्वतःच्या हाताने त्या काढत आहेत.
त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील काळदरी गावातील सुभद्रा यादव वय ७० वर्ष यांच्या डोक्यात गेली पंधरा वर्षापासून पाच किलो वजनाची जट होती. पंधरा वर्षापूर्वी जेव्हा छोटीशी जट डोक्यात झाली असता गावातील लोकांनी ती देवाची आहे असे सांगितल्यामुळे ती कापली नाही. त्यामुळे त्यांनी ती जट न कापता गेली पंधरा वर्षे तशीच डोक्यावरती ठेवली जातात. कोणत्याही देवाचं, गुरु करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मात्र गावातील लोक सौंदतीच्या देवीला जाण्याचा आग्रह करततात. ज्यांच्या अंगातही कधी आले नाही. त्या सुभद्रा यादव डोक्यातील जट काढल्यानंतर त्यांच्या डोक्यावरचे ओझे एकदम कमी झाले त्यामुळे त्यांना खूपच हलके वाटू लागते.गेली १५ वर्षे या जटेमुळे त्या व्यवस्थित झोपू शकलेल्या नसतात. सुभद्रा यादवला शेतात काम करताना प्रचंड त्रास होत असे. अशा महिलांच्या दारात जाऊन त्यांचे मनोबल वाढवणे ,त्याचे समोपदेशन करणे या सगळ्या कार्यात नंदिनी जाधव महिलांच्या जीवनात परिवर्तनाचे रंग मोठ्या आवडीने भरताना. असे हे कार्य त्यांनी हडपसर पासून बावन्न किमी अंतरावर असलेल्या काळदरी या गावी जाऊन त्यांनी जट निर्मूलन केले. त्याचप्रमाणे भोर येथील शोभा कांबळे त्या ५८ वर्षाच्या आहेत. गेल्या २०वर्षापासून साडे चार फूट लांबीची व २किलो वजनाची जट त्या सांभाळून होत्या. या ओझ्यामुळे मानेला पाठीला त्रास ,रोजची कामे करता न येणे,जट काढावीसी वाटणे पण मनात भीती असल्यामुळे जट काढण्याचे धाडस होत नसे.या महिला भीतीच्या खाईत इतक्या त्रासून घेल्या होत्या की,स्वतःच्या शरीरास होणारा
असाह्य शारीरिक,मानसिक त्रास सहन करू शकत नव्हत्या पण यातून सुटका करण्याची कोणाकडे वाच्यता करत नव्हत्या.जर आपली जट कापल्यास काहितरी होणार या भावनेत जीवन कंठत होत्या.अशा प्रकारे समाजातील वास्तव जेव्हा समोर येते तेव्हा अंधश्रद्धा किती खोलवर रूतलेली आहे हे स्पष्ट होते. या सगळ्या बाबी पुढं पुढं येऊ लागल्या की भारतीय समाजव्यवस्थेची खोली मोजता येते आणि स्मार्ट इंडियाचे स्वप्न खोटे वाटते. दौड तालुक्यातील अलका होले या महिलेची १५वर्षपासूनची ४फुटाची जट. तर भिवंडीत सुचित्रा प्रभुलकार ७०वर्षीय महिलेची ३फुटाची जट या सगळ्या बाबी म्हणजे भारतात विज्ञान नाहीतर अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पुणे जिल्ह्यातील उरळीकांचन या गावातील सुगंधा सूर्यवंशी वय ६०वर्षे त्यांच्या डोक्यात गेली १७ वर्षांपूर्वी जट झाली होती.डोक्यात जट झाल्यानंतर त्यांनी गुरु केला आणि त्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च केले.जट कापली तर घरावर वाईट संकटे येईल अशी भीती मनात केल्यामुळे या जट काढण्यास तयार होत नव्हत्या. जटे मुळे शारीरिक त्रास वाढत होता. पण मनात भीती असल्यामुळे डोक्यातील जट कापण्यास त्या तयार होत नव्हत्या. अशावेळी एका वर्षापूर्वी त्याच गावातील जट निर्मूलन केलेल्या महिलेची जेव्हा भेट घेतली . तेव्हा जट कापल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही वाईट संकट आले नाही. याची खात्री केल्यानंतर त्या महिलेने जट काढण्याची विनंती केली.
हा प्रकार जेवढा वयस्कर महिलांच्या बाबतीत पाहावयास मिळाला तोच प्रकार शालेय विद्यार्थिनीच्या बाबतीतही अपवाद ठरू शकला नाही. पुणे जिल्ह्यातच विंझर राजगड पायवा गावात साक्षी आखाडे या १०वर्षीय कोवळ्या बालिकेला सुद्धा याचे शिकार व्हावे लागले.शाळेत इतर विद्यार्थिनी सोबत खेळू देत नसतात.शिक्षक इतरही मुलीला तिच्या डोक्यातील उवा होतील म्हणून तिला शाळेतच येऊ नको म्हणून बजावतात.आणि आम्ही बुलेट ट्रेनची आखणी करू लागलो.यातील दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीने तर कहरच केला. चक्क शिक्षकाची पत्नी जटधारी निघाली. आतापर्यंत अशा एक नाही दोन नाहीतर तब्बल १८४जट निर्मूलनाचे काम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कडून करण्यात आले.व विशेष बाब म्हणजे ज्या संविधान निर्मितीने आपण स्त्रियांच्या बाबतीत जी स्वतंत्रता, मोठ्या उत्साहाने मंडळी जाते.त्यातील एका महिलेचे जट तर अगदी संविधान दिनी जट निर्मूलन करण्याची वेळ आले. ह्या सगळ्या बाबी म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेतील वास्तव चेहरा प्रकट करणाऱ्या आहेत. का झाली नाही अजूनही ती स्त्री मुक्त ?ज्या स्त्रियांच्या बाबतीत विशेष आरक्षण,शिक्षण,सामाजिक न्याय सगळ्या तरतूदी करण्यात आल्यातरी अजूनही स्त्री का विनते तेच परंपरेचे जाळं? माहितीच्या अफाट जाळ्यातील जटधारी स्त्रीचे केस अजूनही जटाच जाळं धरून असणाऱ्या व्यवस्थेत अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव व त्यांची अंनिसचे सहकारी हा गुंता सोडवत आहेत.समाजातील यासारख्या अनेक समस्यांचे समूळ नष्ट करायचे असल्यास अशा अनेक नंदिनी जाधव तयार व्हाव्या व अंनिसचे हात बळकट होणे गरजेचे आहे. सामाजिक जीवनात वावरताना यासारख्या समस्या आपल्य परिसरात आढळून आल्यास अंनिसच्या लक्षात आणून आपण या चळवळीला ,विचारला,विवेक,विज्ञानाची कास धरून उत्तरोत्तर समृद्ध करावे.अशा महत्वपूर्ण कार्यात परंपरेने शोषित महिलांचं दुःख दूर करणाऱ्या नंदिनीताई जाधव व त्यांचे अंनिस सहकारी यांच्या हाताला व कार्याला मनस्वी सॅल्यूट नक्कीच होतो.
--मनोहर सोनकांबळे
८८०६०२५१५०,८४५९२३३७९१ manoharsonkamble 255@gmail.com (एम. फिल. संशोधक विद्यार्थी स्कुल ऑफ मिडिया स्टडीज) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)
No comments:
Post a Comment