विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 10 November 2020

विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना..

 


औरंगाबाद, दिनांक 10 (विमाका) :-  05-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निडणूक 2020 साठी विभागीय व जिल्हास्तरीय माध्यम कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीची आणि माध्यम कक्षाची स्थापना जिल्हा माहिती कार्यालय, अरिहंत बिल्डिंग, सिटी सर्व्हे नंबर 2714, खडकेश्वर, औरंगाबाद येथे करण्यात आली आहे.  

प्रसारमाध्यमांना पदवीधर निवडणूक संदर्भातील असलेली माहिती, वृत्त, या समितीच्या माध्यम कक्षातून व्हॉटस् ॲप व ई-मेलच्या माध्यमातून देण्यात येईल. स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षाशी संपर्कासाठी directorinf.aurangabad@gmail.com,distinfoffice@gmail.com या ईमेल आयडीवर तसेच दुरध्वनी क्रमांक-0240-2331085 व 0240-2331285 संपर्क साधता येईल. विभागीय समितीच्या माध्यम कक्ष प्रमुख म्हणून सहायक संचालक (माहिती) मीरा ढास व त्यांच्या सह माहिती सहायक रेखा पालवे या  कामकाज पाहतील. 

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीमध्ये अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण, समितीचे सदस्य म्हणून डॉ.स्वप्नील मोरे (उपविभागीय अधिकारी पैठण-फुलंब्री), डॉ.दिनकर माने (विभाग प्रमुख, जनसंवाद वृत्तपत्र विद्या विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ), गीत बागवडे (पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पोलीस आयुक्तालय औरंगाबाद), श्री.रमेश जायभाये सहायक संचालक (वृत्त) आकाशवाणी औरंगाबाद, तर सदस्य सचिव तथा माध्यम कक्ष प्रमुख म्हणून जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत हे कामकाज पाहत आहेत. 


No comments:

Post a Comment

Pages