तार... एक संवादीक प्रक्रियेचा भावस्पर्शी लघुपट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 November 2020

तार... एक संवादीक प्रक्रियेचा भावस्पर्शी लघुपट

 



तार...  लघुपट परीक्षण


संवाद ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. अगदी गर्भातील बाळसुद्धा आईसोबत संवाद साधत असतं. गर्भातील त्याच्या हालचाली ह्या आईसोबतचा संवाद होय.संवादाची ही प्रक्रिया जन्मानंतर व्यापक होत जाते.

स्वतःशी,आई,कुटुंब,शेजारी,गावापासून ते राष्ट्र, आंतराष्ट्रीय संवाद हा जो संवादीक प्रवास आहे,तो नैसर्गिक आहे.म्हणूनच संवादाशिवायची कल्पना मानवी समूहात करणे अशक्यच.अशीच एक संवादाची पद्धती म्हणजे १८५४साली सुरु झालेली तार सेवा १५जुलै २०१३ला बंद करण्यात आली.एकशे एकोणसाठ वर्षाच्या या प्रदीर्घ कालखंडात तार सेवेतून जो संवाद झाला तो अद्वितीय म्हणावा लागेल. संवादाचा तो प्रकार अगदी भावपूर्ण होता.जिव्हाळा,आत्मीयता,आपुलकी,या सगळ्यांची गोळाबेरीज आजच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोबाईल,व्हाट्सउप,फेसबुकवरील अन्य कितीतरी चॅटिंगची डिजिटल क्रांती फिकी पडणारी आहे.जग मुठीत आल्यानंतर घरातला ताटात ताट लावून जेवत असतानाच, प्रवासामध्ये जवळ बसलेला माणूस मात्र आमच्यापासून दूर आहे.पूर्वी गावात जर पत्रे किंवा तार आले तर त्यात संपूर्ण कुटुंबातील सदस्य, शेजारी,यासह गावातल्या सर्व माणसांच्या खुशालीची खबरबात त्यातून घेतलेली जात असे.आज अंगात ताप दुखणे घेऊन एक एक दिवस मोठया वेदनेने विव्हळत काढणाऱ्या आई-वडिलांची तबेत आम्हाला आठ आठ दिवस समजतही नाही.काम पगार,दगदग,वर्कलोड आणि बरेचकाही. या सर्व प्रक्रियेतून जी गोष्ट आज आपल्यातून हरवत चालली आहे ती म्हणजे संवाद. सकाळी सकाळी शे-दोनशे मित्रांना व्हाट्सउपच्या माध्यमातून गुड मॉर्निंग,पुष्पगुच्छ,चाय, बिस्कीटचे अँनिमेशन पाठवून घरात मात्र शिव्या,अन्यथा महिना महिना घरात वेगवेगळ्या कारणावरून अबोला ठेवणारा आजचा माणूस वास्तवात मात्र संवादशत्रू झाला आहे.अशा बेगड्या मनोवृत्तीला जागं करणारात्यांच्यात आंतरीक संवाद साधून मानवी संवेदनेला हात घालनारा मुंबई फिल्म कंपनी प्रदर्शित .पंकज सोनवणे यांच्या लेखन व दिग्दर्शनातून नुकताच प्रेक्षकांपर्यंत जाणार लघुपट म्हणजे तार. वर उल्लेख केल्याप्रमाणे आज तर सेवा काळाच्या पडद्याआड गेली.पण या तार सेवेचा आणि त्यातून झालेल्या संवादाचा ठेवा न जपणे म्हणजे संवादीक प्रक्रियेला छेद देणे होय.एकशे एकोणसाठ वर्ष चाललेल्या तार सेवेचा बऱ्याच भारतीय चित्रपटातून त्या त्या प्रकारचे दृश्ये आपणास पाहावयास मिळतात. पण दिग्दर्शक,अभिनेता असणारे आणि हल्ली मराठी चित्रपटसृष्टीत पिस्तुल्या, फँड्री, सैराट,नाळ, हायवे,या कलाकृतींची निर्मिती करणारे नागराज मंजुळे ज्या प्रमाणे शिक्षणाची असा आणि परिस्थिती या अशयावर आधारित  पिस्तुल्या जगासमोर आणतात.त्याचप्रमाणे शालेय जीवनातील कोवळे प्रेम,घरची गरिबी,गावातील सर्वोत्तम निम्न ठरवल्या जाणाऱ्या बापाच पोरगं जब्या आणि त्याच्या मनातील अपमानित झालेल्या भावना,परिस्थिती या सगळ्या बाबी मानवी संवेदनाला हात घालतात.सैराट नंतरची नाळ जी ग्रामीण वास्तव पडद्यावर आणून माणसांच्या प्रश्नाचे,जीवनाचे व माणसातला माणूस जागं करणारे सिनेमे नागराज मंजुळे समोर आणत आहेेेत त्यात तार  मधील अभिनयाने नागराज मंजुळे पुन्हा एकदा  प्रेक्षकांसमोर आले आहेत.एकोणविस शे ऐकाहत्तर सालची परिस्थिती,ग्रामीण भाग आशिक्षिततेचे स्वरूप या प्रकारच्या काळात सायकलवर गावोगावी जाऊन तार, पत्रे पोहचवणारा   व्यंकटराव म्हणजे नागराज मंजुळे एका  हळव्या मनाच्या पोस्टमॅनची भूमिका बजावतात. एकोणविस मिनिटांचा असणारा हा लघुपट संवादीक प्रक्रियेच त्याकाळचे आपल्यासमोर येते.त्यातील चित्रण मानवी संवादाचे तार हे माध्यम मनाला स्पर्श करणारे आहे.जेंव्हा तारेच्या माध्यमातून संवाद साधला जात असे त्यावेळची परिस्थिती म्हणजे चिंताजनक होती.आजही आपणास अपरात्री,सकाळी सकाळी आलेले फोन जसे चिंताजनक वाटतात.अगदी तसेच गावात येणारी तार सुद्धा तशीच काहीशी संशयकल्लोळ माजवणारी आहे.व्यंकटरावच्या घरी  पाळणा हालत लागत नाही त्याचे कारण म्हणजे लोकांच्या मरणाच्या खबरबात तारेच्या माध्यमातून देतात  हेच आहे असे वाटू लागते.यातील सर्व प्रसंगातून मनाच्या घालमेलीत अडकवून हळव्या मनाच्या व्यंकटरावांना ही नोकरी नको वाटते.त्त्यांच्या मनातील भावना व्यक्त करताना म्हणतात की,

"काल तार घेऊन गेलो होतो         

  एका घरी

तिथली बाई पोटुशी होती

तिचा नवरा तिकडं लढाईत मेला

समोर तार वाचवून दाखवत असतांना मला यमदूत असल्यागत वाटत होत

माजच्याने होणार नाही"

 असा लोकांच्या दुःखावर स्वतःच मेल्यागत होणारा व्यंकटराव इतका हळवा आणि माणसाप्रती असलेली संवेदना या प्रसंगातून आपणास खिळून ठेवते.म्हणून ते म्हणतात

"अजून किती माणसं मेल्यावर संपते ही लढाई"

युद्धाच्या त्या काळात गावात तार आली म्हणजे गावातील सैन्यात असणारा रावसाहेब जाधवलाही वीरमरण आले असे समजून टाहो फोडणारा सगळा गाव, खजील व्यंकटराव हे चित्र मनाला लागणारे आहे.या भावगर्भातून दुःखावर विरंजन पडणारे दुसरे प्रसंग नेहमी तार वाटपात स्वतःला शापित समजू लागणाऱ्या व्यंकटरावांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटतं हे दृश्य म्हणजे मानवी संवादी प्रक्रियेचा संवाद म्हणजे कोड्यात टाकणारी तार.काहीशी क्लेशदायक,काहीशी गुदगुल्या केल्यासारखी आहे.अशा आशयावर उतरलेला तार हा लघुपट म्हणजे प्रेक्षकांची

आंतरिक तार छेडणारा आहे.



   -मनोहर सोनकांबळे

    ८८०६०२५१५०

Email-manoharsonkamble255@gmail.com

( मफिल  संशोधक विध्यार्थी

स्कुल ऑफ मीडिया स्टडिज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)

No comments:

Post a Comment

Pages