उपा. इंदुबाई वाघमारे यांच्याकडून श्रामनेरी शिबिरास मास्क चे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 9 November 2020

उपा. इंदुबाई वाघमारे यांच्याकडून श्रामनेरी शिबिरास मास्क चे वाटप

 
नांदेड-ऑल इंडिया भिक्खुणी संघ यांचे सचिव भिखुनी भंते सुनीती व भिखुनी मैत्रीय यांच्या द्वारे आयोजित दहा दिवसीय श्रामनेर शिबिर नांदेडच्या नवी वाडी येथील सर्वज्ञ बुद्ध विहार येथे आयोजित करण्यात आले आहे

           सदर शिबिर 5 नोव्हेंबर पासून सुरू झाले असून या शिबिराचा 15 नोव्हेंबर ला समारोप होणार आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून मुलींनी भाग घेतला आहे. या दहा दिवसांमध्ये त्या भिक्खूनी जीवनाचा अभ्यास व अनुभव घेऊन धम्माकडे एक पाऊल पुढे चालत आहेत.        

           या शिबिरास उपासिका इंदुबाई शेषेराव वाघमारे  राहणार आंबेडकर नगर, नांदेड. यांच्याकडून सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत आज मास्क चे वाटप करण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages