अनुसुचित जमाती कल्याण समिती सदस्यपदी आमदार भिमराव केराम यांची निवड..... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 6 November 2020

अनुसुचित जमाती कल्याण समिती सदस्यपदी आमदार भिमराव केराम यांची निवड.....

 'विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते निवड'


किनवट :

  अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी किनवट माहूरचे आमदार भिमरावजी केराम यांची निवड करण्यात आली असून विधानसभा नियम २३५ अन्वये महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांनी आ. केराम यांची निवड केल्याने तालुक्यातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

   दि.३ नोव्हेंबर रोजी विधानसभा अध्यक्षांच्या हस्ते महाराष्ट्र विधानसभा नियम २३५ नुसार अनुसुचित जमाती कल्याण समितीची निवड करण्यात आली.  या निवडीत अनुसुचित जमाती कल्याण समिती प्रमुख (अध्यक्ष)  म्हणून श्री. दौलत दरोडा, विधानसभा सदस्य यांची निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणून महाराष्ट्र विधानसभा सदस्य म्हणून कार्यरत असलेले श्रीनिवास वनगा यांच्यासह महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, साहसराम कोरोटे, डॉ.अशोक उईके, डॉ. तुषार राठोड, राजेश पाडवी, भिमराव केराम व राजकुमार पटेल यांची अनुसुचित जमाती कल्याण समितीच्या सदस्यपदी विधानसभा अध्यक्ष्यांच्या हस्ते निवड करण्यात आली. या निवडीने आदिवासींच्या कल्याणासाठी आ. केराम यांना हत्तीचे बळ मिळेल ही भावना व्यक्त करून सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages