स्वतंत्र महिला रुग्णालयाचा प्रश्न सुटणार.. आमदार भीमराव केराम यांचा पाठपुरावा सुरू! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 19 November 2020

स्वतंत्र महिला रुग्णालयाचा प्रश्न सुटणार.. आमदार भीमराव केराम यांचा पाठपुरावा सुरू!


किनवट/ प्रतिनिधी:

आदिवासी दुर्गम अति डोंगराळ माहूर किनवट तालुक्यातील अवघड प्रसूती अवस्थेतील गरोदर महिला रुग्णांना सोयीचे ठरेल यादृष्टीने स्वतंत्र महिला रुग्णालय मंजूर करण्याची मागणी किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


माहूर किनवट तालुक्यात अनुक्रमे गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालय तर माहूर आणि मांडवी येथे ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित आहे.परंतु गरोदर मातांना प्रसूतीसाठी अवघड अर्थात अडलेल्या सिजरींग किंवा इतर शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध नसल्यामुळे तब्बल दीडशे किलोमीटर जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा आदिलाबाद,यवतमाळ सारखे मोठे शहर गाठावे लागते त्यात प्रसूतीला विलंब होतो. आणि अपवादात्मक परिस्थितीत माता किंवा नवजात बालकाचा मृत्यू होतो किंबहुना त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. प्रसुतीकाळा दरम्यान दुर्गम डोंगराळ भागातील खेड्या गावातून दवाखान्यापर्यंत येण्यासाठी गरोदर माता महिलांना मोठ्या सामाजिक कुचंबनेला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात दर्जात्मक आरोग्य सेवा मिळण्यासाठी किनवट येथे विशेष बाब म्हणून सर्व सोयी सुविधा युक्त स्वतंत्र महिला रुग्णालयाची मागणी समोर येत होती.परंतु मागील पंधरा वर्षात या मागणीला परिणामकारक पाठपुरावा करण्यात न आल्यामुळे महिला रुग्णालयाचा प्रश्न खितपत पडला होता.महिलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या विषयाला किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी हातात घेतले असून यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री श्री.राजेश टोपे सोबतच जिल्ह्याचे शल्यचिकित्सक यांना पत्र पाठवून किनवट येथे स्वतंत्र महिला रुग्णालयाला मंजुरी देण्याची आग्रही मागणी आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 19 रोजी केली आहे. आमदार भीमराव केराम यांच्या दूरदृष्टीतून आदिवासी उपयोजना क्षेत्रातील माहूर आणि किनवट तालुक्यातील विविध विषय झपाट्याने निकाली निघत असल्यामुळे महिला रुग्णालयाचा प्रश्नही तेवढ्याच लवकर सुटेल अशी प्रतिक्रिया महिला मंडळाकडून व्यक्तविली जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages