ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे भारतीय संविधान दिन साजरा : बाबा कांबळे यांचा संविधान दिना निमित्ताने सत्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 27 November 2020

ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे भारतीय संविधान दिन साजरा : बाबा कांबळे यांचा संविधान दिना निमित्ताने सत्कार

पुणे :  देहू रोड येथिल बुद्धभूमीच्या परिसरात संविधान दिन साजरा करण्यात आला.  बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस बाबा कांबळे अनिता साळवे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि भारतीय संविधानाचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी भीमापुत्र टेक्सास गायकवाड म्हणाले, नेल्सन मंडेला बाराक ओबामा हे जेव्हा जेव्हा भारतात आले त्यावेळी ते म्हणत भारतातून घेऊन जाण्यासारखे काय असेल तर ते म्हणजे भारतीय संविधान ,  असे जगातील सर्व श्रेष्ठ भारतीय संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले आहे ,

कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे म्हणाले  महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ज्या  भूमीला स्पर्श झाला अश्या ऐतिहासिक देहूरोड धम्मभूमी धम्मभूमी  येथे पंचशील देऊन  संविधानदिनी माझा जो सन्मान होत आहे हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

अनिता सावळे म्हणाल्या मी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीनंतर प्रथम फिर्याद दिली यानंतर मला विविध  पातळीवर त्रास देण्याचा प्रयत्न झाला मला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला परंतु मी न डगमगता हे कार्य असेच सुरू ठेवले यासाठी भारतीय संविधानातील हक्क अधिकार आणि मूल्य स्वातंत्र्य यातून प्रेरणा मिळाली.

या वेळी अजय लोंढे , अशोक गायकवाड , प्रकाश गायकवाड यांनी मनोगत व्यात केले . बुद्ध विहार कृती समितीचे  नेते भीमपुत्र टेक्सासदादा  गायकवाड, भिम कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्षा अनिता सावळे, लोकशाही संस्था अध्यक्ष अजय लोंढे ,  धमपाल  तंत्रपाळ , अशोक गायकवाड , भिम आर्मीच्या रिणा टाक , विद्या जाधव , रंजना सोनवणे, शंकर तायडे , प्रकाश गायकवाड , आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment

Pages