स्वाभिमानी युवा सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 30 November 2020

स्वाभिमानी युवा सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड

 



किनवट (प्रतिनिधी)किनवट येथील तरुण, तडफदार धडाडीचे कार्यकर्ते दया पाटील यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन स्वाभिमानी युवा सेनेचे संस्थापक, अध्यक्ष अजय भैय्या पाचपिंडे यांनी त्यांची स्वाभिमानी युवा सेना संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती केली असून या नियुक्तीबद्दल दया पाटील यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे

 समता नगर येथील रहिवासी असलेले दया पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन चळवळीत सक्रियपणे काम करतात. वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून ते सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. गोरगरीब लोकांच्या प्रश्नासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून त्यांनी किनवट तालुक्यासह मराठवाड्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली. तरुण, तडफदार व्यक्तिमत्व तसेच दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर दया पाटील यांनी राजकीय क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या या कार्याची स्वाभिमानी युवा सेनेने दखल घेतली असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजय भैय्या पाचपिंडे यांनी संघटनेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर करून दया पाटील यांची स्वाभिमानी युवा सेनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती केली असून तसे नियुक्तीपत्र दया पाटील यांना देण्यात आले आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी स्वाभिमानी युवा सेना ही संघटना महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब, दलित, आदिवासी, वंचित, शोषित, शेतकरी, मजूर व दीनदुबळ्यांच्या हितासाठी काम करते.

 स्वातंत्र्याची 70 वर्षे लोटली तरी दलित,आदिवासी,शेतकरी, शेतमजूर तसेच भटक्या जमातींची अवस्था जैसे थे आहे. दीनदुबळ्या, मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंतच्या कोणत्याही सरकारने ठोस उपाय योजना राबविल्या नाही.रस्ते, पाणी,विज, रोजगार,शिक्षण अशा मूलभूत व संविधानिक हक्कासाठी मागासवर्गीयांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागतो. स्वाभिमानी युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय भैय्या पाचपिंडे यांनी मला संघटनेच्या मराठवाडाअध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखविला तो विश्वास संघटनेच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देऊन सार्थ ठरवेन तसेच संपूर्ण मराठवाड्यात संघटनेचे विचारधारा घरोघरी पोहोचवून स्वाभिमानी युवा सेना मजबूत करणार असल्याच्या प्रतिक्रिया दया पाटील यांनी नियुक्ती नंतर दिल्या आहेत. या नियुक्तीबद्द पि री पा चे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे, नगरसेवक कैलास भगत, शेख अफरोज, अभयदादा नगराळे, राजपाल उमरे,बालाजी न्यालम वार, जयपाल मुनेश्वर, अक्षय कावळे, राजेश परेकार, माजी नगरसेवक प्रकाश नगराळे यांच्यासह सर्वच स्तरातून दया पाटील यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages