आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन महाराष्ट्र च्या मागणीला यश, सरकार कडून सकारात्मक संकेत. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 30 November 2020

आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन महाराष्ट्र च्या मागणीला यश, सरकार कडून सकारात्मक संकेत.



सैन्यदलात व पोलिस भरती होवु इच्छिणाऱ्या अनुसूचित जात प्रवर्गातील तरूणांची होणारी गैरसोय आणि प्रशिक्षणा अभावी कित्येक तरूण पात्र असतानाही त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शनाअभावी भरती प्रक्रियेतून बाद होत असतात व पात्रता असतानाही नैराश्येला सामोरे जातात. यामुळे अनेक वर्षापासून या प्रवर्गातील तरूण पात्रता असतानाही योग्य प्रशिक्षणा अभावी  या भरती प्रक्रियेतून बाहेर फेकले जातात. त्यांची ही समस्या आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र ने लक्षात घेतली आणि  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या कडे अनुसूचित जाती /नौबौध्द प्रवर्गातील, सैन्यदलात व पोलीस मध्ये भरती होवु इच्छिणाऱ्या तरूणांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या कडून हक्काचे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र असावे जिथे त्या तरूणांना आवश्यक ते सर्व शैक्षणिक साहित्य,योग्य ते प्रशिक्षण व सदर कालावधीत त्यांच्या राहण्या खाण्याची  सोय इत्यादी पुरविणारे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र मिळावे अशी मागणी केली होती. या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या माध्यमातून सरकार कडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत .लवकरच संघटनेच्या मागणी च्या दृष्टिकोनातून विचार करून कांही सुधारित सुचनांसहीत प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे समाज कल्याण आयुक्तालयाकडून  पत्राद्वारे संघटनेचे अध्यक्ष सचिन मनवाडकर यांना कळविण्यात आले आहे. अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठीचे आदेश 

 समाज व जनमानसातून याचे श्रेय आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन महाराष्ट्र चे आहे असे बोलले जात आहे .यासाठी संघटनेकडून संबंधित मागणी व सातत्याने पाठपुरावा संघटनेचे कोषाध्यक्ष बुध्दभूषन कांबळे,महिला अध्यक्ष तृप्ती खैरे, संघटक अभिनव येलवे,आनंदराज घाडगे,सुदर्शन कुलाबकर,कायदेशीर सल्लागार शिवराज कांबळे,कोकण विभाग प्रमुख शिल्पा राव संघटनेचे उपाध्यक्ष दिलीप रणदिवे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे प्रतिपादन संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख एकनाथ गोपाळ यांनी व्यक्त केले आहे. तसेच या मागणीचा सकारात्मक विचार केल्याने मा सामजिक न्याय मंत्री, राज्य मंत्री , सामाजिक न्याय खात्याचे आयुक्त आणि महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे आभार संघटनेचे कोषाध्यक्ष बुध्द भूषण कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages