प्रतिभावंत शाहीर क्षीरसागर मोहणाजी हटकर यांचा जन्म १जानेवारी१९५४साली नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील इजळी या गावी झाला.त्यांचे दहावी पर्यंत शिक्षण झाले . लहानपणीच किनवट तालुक्यातील पहिले सिंगारवाडी व नंतर सावरी या गावी वास्तव्याला आले. या परीसरात सिंगरवाडी,बोधडी,भुलजा,इस्लापुर,भिसी,मुळझरा ,कोल्हारी ,कोसमेट,रिठा,घोटी, अंबाडी या गावात भजनी मंडळी बुद्धभीम गीतं गात असत त्यात वामनदादा कर्डक यांची गीते सादर व्हायची ती गाणी क्षीरसागर हटकर ऐकत.त्यांच्या गाण्यांचा प्रभाव पडला.आपणही तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी गावी असं मनोमन इच्छा केली तीथूनच आवड निर्माण झाली.आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक म्हणून त्यांच्या प्रत्येकच कार्याला डोळ्यासमोर ठेऊन प्रबोधन चळवळीत स्वत:ला त्यांनी वाहुन घेतले.गाणे गात गात वामनदादा कर्डक, शाहीर दलितानंद, नागोराव पाटनकर,साहेबराव कोकाटे,गणेशदादा शिंदे ,सूर्यकांत भगत यांच्या गाण्यामुळे स्फुर्ती मीळाली.अनेकांचा सहवास लाभला त्यात सिंगारवाडीचे खंडेराव वाघमारे,त्यांचे सुपुत्र शेषेराव वाघमारे,इस्लापूरचे मनोहर पवार ,भागाजी शेळके,दत्ता गडलवार,कोसमेटचे व्यंकटी हटकर,बोधडी येथील माधवराव काळबांडे नंतर ते भंते झाले, रावसाहेब कांबळे,सावरीचे माधवराव निखाते, रामराव राऊत,मुंजाजी मस्के,दगडुजी कांबळे, शेषेराव कांबळे,श्रीपती पारडे पांडुरंग वाठोरे, विश्वनाथ लोखंडे ही पंचशील गायन पार्टीतील मंडळी सोबत असायची यात तबला वादक -मुंजाजी मस्के, हार्मोनियम-रामा रायबोळे,एकतारी-माधवराव निखाते व इतर सहकारी घेऊन परीसरात विचार रुजविण्याचे काम केले.या पंचशील गायन पार्टीचे बोधडी,भुलजा,सिंगारवाडी,घोटी, अंबाडी,मुळझरा,पिंपरी,धानोरा,रिठा,इस्लापूर,मोहपूर,सिंदगी,कोठारी,नागझरी,खडकी,पवना,घारापूर,टेंभी,,कामारी,ल्याहरी, वडगाव,तामसा,एकराळा,हरडप खरुस, साखरा,बेलखेड, महागाव,जेवली,सोनदाबी,भोकर तालुक्यातील नागापूर,सोनारी,बल्हाळ,पिंपळडव्ह,बेंद्री,तुराटी,बोथी,नांदा,रावनगाव,मातुळ,लगळुद, नांदेड तालुक्यातील मुगट,विष्णुपूरी,शंभरगाव अर्धापूर तालुक्यातील बारसगाव,बारड, लहान,लोन,चाभरा,कळमणूरी तालुक्यातील दाती,कुरतडी,बाळापूर,सिंदगी,येहळेगाव,सापळी,धावंडा या शिवाय बिलोली,उमरी तालुक्यातील गोळेगाव येथेही कार्यक्रम केले.
शिवनीला हरडपचे गोदाजी वाठोरे यायचे त्यांनी लिहिलेला "भीमलीला संग्रह"हा ओवीबद्ध ग्रंथ परीसरातील गावात शाहीर हटकर वाचत व गोदाजी वाठोरे त्याचा अर्थ सांगायचे यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्र व कार्याची लोकांना ओळख झाली हे विशेष.अनेक गावात गायनकला हे प्रबोधनाचे माध्यम तबला ,पेटी वाजवण्याची कला अवगत करुन इतर खेडोपाडी शिकवण्याचे कामही त्यांनी केले.पवना,रावनगाव,दिघडी,चातारी,लोहरा,डोल्हारी,तुराटी, अंबाडी या गावात यांच्या मार्गदर्शनाखाली भजनी मंडळे तयार झाली.अनेक गावात त्यांचे विद्यार्थी गायक कलावंत कार्यरत आहेत काही नाहीत.धर्माबाद चे बाबाराव जाधव,जुनीचे नामदेवराव तुरेराव,बनचिंचोलीचे कैलास राऊत,मन्याळीचे नागेश काळबांडे,भुजंगा दवने,इंदिराबाई हटकर,कुरोळीचे विष्णु अढागळे,बुद्धभगवान अढागळे,करंजीचे शाहीर संजय घुंगरे,रमेश घुगरे,सावळेश्वरचे नारायण पाटील,विठ्ठलराव पाटील,बिटरगावचे शेकुराव कांबळे, भास्कर कांबळे,भारत कांबळे,दिघडीचे सुनिल कवडे,अनिल कवडे,सिध्दार्थ कवडे,भारत कवडे,विष्णु कवडे,विश्वनाथ कवडे ,सुभाष कवडे इ.भुलजा येथील रामा मुनेश्वर,सटवाजी भौरे,उत्तम भौरे,हिरामण वाठोरे,कांतराव साळवे,ढोलकीवादक नेमाजी तसेच साखरा येथील नारायन वानखेडे,किनवट येथील धोंडीराम लाठे, वामनराव गायकवाड,तबला मास्तर रामचंद्र गायकवाड,सुदाम मुनेश्वर, गोकुंदा येथील किसनराव मुनेश्वर,भारत मुनेश्वर,निवृत्ती नगराळे,ढोलकीपटु पुंडलिक कांबळे विश्वांबर येरेकार यांच्या सोबतही गायनाचे कार्यक्रम करुन प्रबोधन केले.शाहीर हनवते यांच्यासोबत घोटी येथे तर शाहीर दयानंद साबळे सोबत कोपरा येथे त्यांचे प्रबोधनपर गीतांचा सामना चांगलाच रंगला होता.
दलित पँथर चळवळीतील कार्य
किनवट तालुक्यातील लढाऊ संघटन दलित पँथर जातियता, अन्याय अत्याचाराच्या विरोधात जेंव्हा लढा देत होतं त्यावेळी सावरी येथे शाखा स्थापन करण्यात आली क्षीरसागर हटकर यांना अध्यक्ष बनविले समाज पाठीशी उभा राहिला अनेक गावांत त्यांनी शाखा स्थापन केल्या नामांतर लढ्यामध्येही प्रबोधनाबरोबर सहभाग घेतला.
अविस्मरणीय क्षण
महाकवी वामनदादा कर्डक यांची किनवट,इस्लापूर,तामसा,तुराटी, धर्माबाद, माहूर येथे भेट झाली तर त्यांच्यासोबत पाठीमागे गायण करायला मीळाले, शाहीर दलितानंद यांना अंबाडी येथे साथ संगत केली, शाहीर आत्माराम साळवे यांच्यासोबत इस्लापूर येथे गीत गायन केले.आदिलाबाद येथील गझलकार मधु बावलकर व किनवट येथील कवी महेंद्र नरवाडे यांच्या रचनेचाही प्रभाव त्यांना गीत लिखाणासाठी व गायन कलेत झाला असं आवर्जुन सांगतात.तसेच उत्तम कांनिंदे सर यांनी प्रबोधन चळवळीतील वाटसरु म्हणुन संधी मिळवून दिली हेही सांगायला ते विसरले नाहीत.
प्रकाशित गीत संग्रह
'भीमक्राती गीते '(२० गीतं) प्रकाशित.
नवीन एक गीत संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
मनपसंत स्वलिखित गीतं...
१)भीमाई पाऊल लागताच चाहुल
काळ दडला हा खालच्या तळा.
२)आम्हाला भीमा लाभला हा जिव्हाळा
पावसाने भीजला पण वाकेना लव्हाळा.
३)तत्व बुद्धाचे तू शोधतांना
मना अविचारी होऊ नको रे
गुण बाबांचे तू घोळतांना
शील पैशाला विकू नकोरे.
४) नेमाने वाग जमानेवाले
कदर कर तू तूझे जगभर भटकना हैं
मिठीमे मीले अगर तुझको
घर घर भटकना हैं.
५)साहिले किती तू भीमा चटके उन्हाचे गळतातांना घाम तुझा ते चटके उन्हाचे.
ह्या स्वलिखित गीतासह महाकवी वामनदादा कर्डक यांची एकसे नव्वद गाणी त्यांना मुकपाठ होती."बोल उठे हलहल तब जमाना बदलेगा,तुझको मिलेगा फल तब जमाना बदलेगा ही "कव्वाली वामनदादाच्या शैलीत हटकर सादर करत.
"रान उन्हाळे,रान पावसाळे,रान हिवाळे या तिन्ही ऋतुत मी नांदत होतो
माणसे मला लडीवाळे,गोताळे,जिव्हाळे मिळाले" ह्या रचनेबरोबर ते जीवन व्यथाही मांडतात-
"माझे जीवन मी करतो जतन
जगतो मी आता जगावे म्हणून
ही कसली रे दुनिया तिचा अंत नाही
निंदा जरी केली मनी खंत नाही
कैक भले भले पाहुनी का जळे
काळजाचे तुकडे कुणा न कळे
डोई माझ्या कफन त्यात माझे दफन."
पुरस्कार
१.सुगंधा पुरस्कार भुसावळ
२.वामनदादा कर्डक पुरस्कार गुरजामनूर.
३.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, आदिलाबाद.
४.वामनदादा कर्डक समाज प्रबोधन रत्न पुरस्कार,किनवट.
संदेश
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर समाजरथ प्रत्येकानेच पुढे न्यावयाचा आहे आपसातील हेवेदावे सोडून ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाला काही द्यावे लागते ही जाण उरासी बाळगून समाज कार्याला वाहून घ्यावे असा मोलाचा सल्ला शाहीर क्षीरसागर हटकर आपल्या प्रबोधन कार्यातून देतात. पुढील प्रभावी गीत रचना तयार करण्यासाठी त्यांना दिर्घायुष्य लाभो हीच मंगल मनोकामना.धन्यवाद.
आयु.महेंद्र नरवाडे,किनवट
मो.न.९४२१७६८६५०
No comments:
Post a Comment