मुंबई दि. 30 - रिपब्लिकन पक्षाचे माजी नगरसेवक प्रकाश भोसले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा हिरा हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत प्रकाश भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नामांतर आंदोलनात प्रकाश भोसले यांनी बालवयापासून सहभाग घेतला.माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय दलित पँथर ते रिपब्लिकन पक्ष मला साथ दिली. नामांतर चळवळीत प्रकाश भोसले यांनी भरीव योगदान दिले. चेंबूर अनुशक्तीनगर भागात रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून अनेक वर्षे त्यांनी जनसेवा केली. नगरसेवक म्हणून त्यांनी लोकप्रिय होते.त्यांचे व्यक्तिमत्व नम्र ; निष्ठावान
आणि अभ्यासू असल्याने ते कार्यासम्राट समाजसेवक होते त्याच प्रमाणे व्यक्ती म्हणून सुस्वभावी जणू आंबेडकरी चळवळीचा प्रकाशमान हिरा होते. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे अशी शोकभावना ना. रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment