मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत रिपब्लिकन सेनेकडून - सचिन निकम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 13 November 2020

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत रिपब्लिकन सेनेकडून - सचिन निकम

 ॲड.अतुल राजेंद्र कांबळे हे विधानपरिषद निवडणुकीची वयोमर्यादा पूर्ण करू न शकल्याने त्यांचा अर्ज रद्द...


औरंगाबाद :

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आंबेडकरी मतदार हा महत्वपूर्ण भूमिकेत असल्याने आंबेडकरी मतदारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहिल्यांदाच रिपब्लिकन सेनेने ह्या निवडणुकीत उडी घेतल्याने ह्या निवडणुकीत आंबेडकरी जनतेचा कौल कुणाकडे राहील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

रिपब्लिकन सेनेच्या वतीने सर्वात अगोदर उमेदवार जाहीर केल्याने ह्या निवडणुकीत रिपब्लिकन सेना चर्चेत आली आहे.

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष

ॲड.अतुल राजेंद्र कांबळे यांची उमेदवारी पक्षाने घोषित केल्याने विद्यार्थी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा घडून आली होती.

परंतु ॲड.अतुल कांबळे हे विधानपरिषद उमेदवारी साठीची वयोमर्यादा पूर्ण करू शकत नसल्याने

तात्काळ मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे नेतृत्व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम यांना पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने ही निवडणूक चुरशीची ठरली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व मराठवाडा विभागातील विद्यार्थी चळवळीतील आंबेडकरी नेतृत्व म्हणून सचिन निकम यांच्या कडे पाहिले जाते.

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावान सक्रिय युवा नेतृत्व, म्हणून त्यांची ओळख आहे औरंगाबाद सह मराठवाड्यातील सर्व आंबेडकरी युवा नेते-कार्यकर्ते,पक्ष संघटना ह्यांचा मोठा पाठिंबा त्यांच्या मागे आहे.

No comments:

Post a Comment

Pages