हक्क आणि अधिकार मिळविन्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनमध्ये या : मा.महेश भारतीय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 14 November 2020

हक्क आणि अधिकार मिळविन्यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनमध्ये या : मा.महेश भारतीय

 





 भंडारा आणि गोंदिया जिल्हाच्या वतीने सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा विद्यार्थी मेळावा भंडारा शहरात घेण्यात आला. कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक मा.महेश भारतीय महाराष्ट्रराज्याध्यक्ष सम्यक्ष  विद्यार्थी आंदोलन

 प्रमुख  अतिथी प्राध्यापक पंकज नागदेवे भंडारा-गोंदीया जिल्हा निरीक्षक सम्यक विद्यार्थी आंदोलन. सोनिया डोंगरे महाराष्ट्रराज्य उपाध्यक्ष सम्यक विद्यार्थी आंदोलन व सुरेश खंगार वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हाध्यक्ष इत्यादी होते.

 सभेला संबोधीत करतांना मा. महेश भारतीय मनाले की, विद्यार्थांना त्यांचे संविधानीक हक्क व अधिकार  मिळविन्यासाठी विद्यार्थ्यांनी  सम्यक विद्यार्थी आंदोलन सोबत जुडले पाहिजे. सम्यक विद्यार्थी आंदोलनाने मंत्रालयामध्ये जावून स्वाधारचे 35 कोटी रुपये मंजुर करून घेतले आहेत.

अनुसुचीत जाती मधील 54 विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती कोविड-19च्या काळात SVA वतीने मंजुर करून घेतली आहे. तसेच डी बी टी अंतर्गत आदिवासी विद्यार्थांचे वस्तीगृह बंद करन्याचा प्रयत्न चालु आहे. आदिवाशी विद्यार्थांच्या बँक खात्यांमधे 6 ते 7 महिने झाले तरी सरकारने पैसे पाठवले नाहीत.ते पैसे लवकर जमा करावे SVAच्या वतीने विनंती करत आहे.प्रत्येक जिल्हातील शिक्षण अधिका-याला विद्यार्थांसाठी चांगले काम करन्याची संधी असते. त्या संधीच त्याने सोन करीत विद्यार्थांच्या शैक्षणिक हिताकडे प्रामाणीकपणे लक्ष द्यायला हवे. खाजगी शाळेतील विद्यार्थांची आर्थिक लुट थांबविन्याचा काम जिल्हाशिक्षणाधिकारी करु शकतो.

नविन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थांचे हिताच कस हा प्रश्न सुद्धा उपस्थीत केला.

प्राध्यापक पंकज नागदेवे म्हणाले  की, विद्यार्थांना समस्या सोडविन्यासाठी संघटन हे महत्वाचे असते.त्या शिवाय आपल्याला समस्या सोडविता येत नाही.विद्यार्थी दशेमधे विद्यार्थांनी आपल्या जीवनाचा पाया मजबुत करत आपल्या हक्कीसाठी लढणे शिकले पाहीजे.

 

सभेत सुरज डाहाके यांची भंडारा तालुका अध्यक्षपदी व लाखांदुर तालुकाअध्यक्षपदी महिंद्र लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली.

एसटी भाईचाराचे  चैतन्य पुरम, गुलाम अंसारी मुस्लीम भाईचारा, ओबिसी भाईचारा पंकज निखाळे  आणि एस सी भाईचारा सांभाळणा-या रितीक बागळे,  यांनी सम्यक विद्यार्थी आंदोलन मधे प्रवेश केला .

या वेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हा भंडारा अध्यक्ष शाम भालेराव तसेच गोंदिया जिल्हा अध्यक्ष सुरंज रंगारी उपस्थित होते.

पवन गजभिये सम्यक विद्यार्थी आंदोलन लाखनी तालुकाध्यक्ष यांनी उत्ककृट संचालन केले.

No comments:

Post a Comment

Pages