व्हीआयपी रस्त्यावरील सिमेंट नालीचे बांधकाम दर्जाहीन ;नागरिकांच्या तक्रारी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 23 November 2020

व्हीआयपी रस्त्यावरील सिमेंट नालीचे बांधकाम दर्जाहीन ;नागरिकांच्या तक्रारी

 


किनवट,ता.२३(बातमीदार):शहरातील एस.व्ही.एम.परिसरातील व्ही.आय.पी.रस्त्यावर दोनही बाजुने करण्यात आलेले सिमेंट नालीचे बांधकाम अत्यंत दर्जाहीन करण्यात आलेले आहे.या कामाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

    व्ही.आय.पी.रस्त्यावर नगर परिषदेच्या वतीने काही महिन्यांपूर्वीच सिमेंट नालीचे बांधकाम करण्यात आले. सदरील बांधकाम हे अन्य एजंसिच्या नावावर प्रत्यक्षात नगर परिषदेच्या उपाध्यक्षानेच केले असल्याचे बोलल्या जात आहे.दर्जाहीन काम करूनही सत्तेत सहभागी असल्याने या कामाचे बिल काढण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही.हे काम करीत असतांना जुन्या नाली बांधकामाचे निघालेले ढब्बर व फाडीही उपाध्यक्षाने विकून खाल्या आहेत.उपाध्यक्षाच्या कुटुंबात सिमेंट एजंशी आहे.नगर परिषदेअंतर्गत काम करतांना हे महाशय  प्रामुख्याने आउट डेटेड सिमेंटचा सर्रास वापर करतात. त्यामुळे कामे दर्जाहीन होतात.

    आओ चोरो, बांधो भारा,आधा हमारा ,आधा तुम्हारा असा कारभार अधिकारी व पदाधिकाऱ्यांत सुरु असल्याने शहर विकासाचे वाटोळे होत असल्याचे एका नगर सेवकाने आपले नाव न टाकण्याच्या अटीवर सांगीतले.

   नगर परिषदेची काही कामे अन्य एजंसीच्या नावावर घेऊन व ती दर्जाहीन करूनही सदरील उपाध्यक्ष हे आर्थिक बळावर लोकप्रतिनिधीला हाताशी धरून पुन्हा उपाध्यक्ष होण्याच्या प्रयत्नात आहेत,हे विशेष.

    या संदर्भात अधिक माहीती घेण्यासाठी उपाध्यक्षांना अनेकदा संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.


No comments:

Post a Comment

Pages