नागपूर :
शैक्षणिक सत्र 2019-20 स्वाधार योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यात निवड झालेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रथम हप्ता ऑक्टोबर 2020 मध्ये देण्यात आला होता.. लगेच दुसरा हप्ता महिन्या भरात देण्याचे सांगण्यात सांगण्यात आले होते परंतु 2 महिने लोटून सुद्धा उर्वरित 2 हप्त्यांची रक्कम अद्यापही विद्यार्थ्यांच्या खात्यात वळती करण्यात आलेली नाही.. त्यामुळे विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.. स्वाधार योजनेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याकारणे रक्कम न मिळाल्यामुळे कर्ज काढून घर भाडे भरावे लागले आहेत.. विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.. करिता विद्यार्थ्यांवर उद्भवलेल्या या सर्व बाबींचा विचार करून स्वाधार योजनेची उर्वरित दोन हप्त्याची रक्कम तात्काळ जमा करावी या संदर्भात मानव अधिकार संरक्षण मंचच्या वतीने निवेदन देण्यात आले.. यात प्रामुख्याने मंचचे आशिष फुलझेले, सचिन रामटेके, राजीव खोब्रागडे, अलोक गजभिये, सुमित कांबळे, निलेश भिवगडे, अनुराग ढोलेकर, मोनिश बावनगडे, सुमित मेश्राम, नीरज रंगारी, कपिल दामोदर, अमित सिंग, राकेश सोनूले, संदीप वाघमारे, सिद्धार्थ बन्सोड, अमित रंगारी, विशाल धाकडे, रिषभ दहीकर, मोनिश मांडवे आणि इतर उपस्थित होते..
No comments:
Post a Comment