माहूर ,दि.३ : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी ३ डिसेंबर रोजी वाई बाजार फाटा येथे उग्र आंदोलन करण्यात आले.
भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांवर पाण्याचा मारा करून, अश्रूधूर सोडून, हायवेवर खड्डे खणून व शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले आठ दिवस बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे.
संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत माहुर तालुक्यातील समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, संघटनांना बरोबर घेत रास्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र केले आहे.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा .या प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या आपल्या अन्नदात्यांच्या या आंदोलनात माहूर तालुक्यातीला जनता प्रचंड संख्येने सहभागी झाली होती .
या आंदोलनात अखील भारतीय किसान सभा , प्रहार, किसान युवा क्रांती संघटना, वंचित बहुजन आघाडी, एस.एफ.आय. ही विद्यार्थी संघटना, सिटु कामगार संघटना सहभागी झाले होते. यावेळी काॅमरेड शंकर सिडाम, जिल्हा सचीव किसान सभा , काॅ. किशोर पवार, काॅ. प्रल्हाद चव्हाण, काॅ.राजकुमार पडलवार, काॅ.गंगाधर गायकवाड, काॅ.परसराम पारडे ,काॅ.अमोल आडे, काॅ.कादर खान ,काॅ.राजु राठोड ,काॅं. चंद्रभान निलेवाड , काॅ. कालिदास सोनुले, काॅं.प्रफुल्ल कऊडकर, काॅ.डिंगाबर कांबळे, अमजद पठाण, प्रशांत शिंदे ,मृणाल येवृतकर, सुरेश आत्राम ,दादाराव गायकवाड सह मोठ्या प्रमाणात शेतकरी कार्यकर्ते हजर होते.
No comments:
Post a Comment