मुंबई दि. 3 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांना यंदा मुंबईत चैत्यभूमीला येता येणार नसल्यामुळे पोस्टकरदद्वारे चैत्यभूमीवर पत्र पाठवून अभिवादन करावे असे आवाहन करणारे कुमार प्रतीक धनराज कांबळे यांची संकल्पना चांगली असल्याचे कौतुक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले आहे. या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळत असून राज्यभरातून देशभरातून आंबेडकरी अनुयायांना चैत्यभूमीला पोस्टकार्ड पत्र पाठवुन यंदा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केले आहे.
यंदा देशभरात कोरोना संसर्गाचा धोका आहे. कोरोना महमारीच्या जीवघेण्या संकटाचा मुकाबला करताना गर्दी कुठेही होता कामा नये याची खबरदारी घ्यायची आहे. चैत्यभूमी ला दरवर्षी 6 डिसेंम्बरला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो आंबेडकरी अनुयायी येऊन अभिवादन करतात. ती प्रचंड गर्दी यंदा होऊ नये म्हणून सर्वांनीच आवाहन केले आहे.त्यानुसार आंबेडकरी जनता या वर्षी चैत्यभूमीवर येणार नाही मात्र आपल्या भावना चैत्यभूमी येथे पोस्टकार्ड द्वारे पत्र पठवून व्यक्त कराव्यात.महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला जाणार नाही असे पहिल्यांदाच होत असून जडअंतकरणाने आंबेडकरी अनुयायांनी ते स्वीकारले असून कोरोना ला हद्दपार केल्या नंतर पुढील वर्षी दुप्पट संख्येने येऊ असा निर्धार करीत पोस्टकार्डद्वारे यंदा अभिवादन करा असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment