हाजी शरफोद्दीन बडगुजर यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 27 December 2020

हाजी शरफोद्दीन बडगुजर यांचे निधन

  किनवट, ता.२७ : शहरातील नवीन तेलीपुरा येथील ज्येष्ठ नागरिक हाजी शरफोद्दीन कमरोद्दिन बडगुजर (वय ७०) यांचे आज(ता.२७) दुपारी एक वाजेच्या सुमारास निधन झाले.

 दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या मुलांने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले .

त्यांच्या पश्चात तीन मुलगे ,दोन मुली, सुना ,जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष शकीलोद्दीन बडगुजर , सा . लोकादेश चे संपादक साजीद बडगुजर व फक्रुद्दीन यांचे ते वडील होत . त्यांच्या पार्थिवावर मोमीनपुरा येथील मुस्लिम स्मशानभूमीत रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार  आहेत .

No comments:

Post a Comment

Pages