स्वा.रा.ती.म. विद्यापीठाची पेट-२०२० परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार? - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 26 December 2020

स्वा.रा.ती.म. विद्यापीठाची पेट-२०२० परीक्षा दोन टप्प्यात पार पडणार?


नांदेड_दि 26 | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची पीएच.डी प्रवेशपूर्व पेट- २०२० परीक्षा दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. प्रथम टप्प्यामध्ये दि. २९ डिसेंबर २०२० रोजी बायोटेक्नॉलॉजी, सिविल इंजिनिअरिंग, इकोनॉमिक्स, एज्युकेशन, इंग्लिश,एन्व्हायर्नमेंट सायन्स,जिओलॉजी, हिंदी,हिस्ट्री, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, मराठी, मॅथेमॅटिक्स, फार्मसी, फिजिकल एज्युकेशन, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क, सोशीओलॉजी, टेक्सटाईल टेक्नॉलॉजी व उर्दू इत्यादी विषयाच्या परीक्षा होणार आहेत.  


दुसऱ्या टप्प्यामध्ये दि. १० जानेवारी २०२१रोजी बॉयोइनफॉर्मेटीक्स, बॉटनी, केमिस्ट्री, कॉमर्स,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग,कॉम्प्युटर सायन्स,डेअरी सायन्स, इसी/ ईसिटी इंजिनिअरिंग,जिओग्राफी, जिओफिजिक्स, लॉ, मॅनेजमेंट, मायक्रोबॉयोलॉजी,फिलोसॉफी, फिजिक्स, पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, स्टॅटिस्टिक्स व  झूओलॉजी इत्यादी विषयाच्या परीक्षा होणार आहेत. वरील दोन्हीटप्प्यातील पेट -२०२० परीक्षा ही विद्यापीठाने निर्धारित केलेल्या नांदेड, लातूर व परभणी शहरातील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. या परीक्षेचे प्रवेश पत्र विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविलेले आहे.

No comments:

Post a Comment

Pages