सचखंड एक्स्प्रेस च्या स्वच्छते विषयी प्रवाशांनी दिले ‘व्हेरी गुड’ ग्रेड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 26 December 2020

सचखंड एक्स्प्रेस च्या स्वच्छते विषयी प्रवाशांनी दिले ‘व्हेरी गुड’ ग्रेड

नांदेड : 

गाडी संख्या ०२७१५/०२७१६ हुजूर साहिब नांदेड -अमृतसर-हुजूर साहिब नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस दिनांक १ जून २०२० पासून सुरु आहे. कोविड-१९ च्या प्रभावामुळे भारतभर रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. लॉकडाऊन नंतर नांदेड विभागातून हीच गाडी सर्वप्रथम सुरु करण्यात आली. कोविड च्या कठीण काळातही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या गाडीत प्रवासी सुविधे / स्वच्छते करिता खूप मेहेनत घेतली आहे.


आता हळूहळू रेल्वे सेवा पूर्ववत होत आहेत. सचखंड एक्स्प्रेस नांदेड विभागातून धावणाऱ्या रेल्वे गाड्यापैकी  एक महत्वाची गाडी आहे. नुकतेच या गाडीच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले आहे. यामुळे या गाडीच्या  स्वच्छते मध्ये खूप प्रगती झाली आहे. या गाडी मध्ये सर्व टोयलेट हे बायो- टोयलेट आहेत. या  बायो- टोयलेट च्या पूर्ण स्वच्छते करिता विशिष्ठ मशीन - बायोटेंक एवाकुयेषण मशीन वापरण्यात येत आहे. यामुळे बायो-टोयलेट च्या स्वच्छते मध्ये प्रगती साधता आली आहे. तसेच या गाडीच्या डब्यांची आतून आणि बाहेरून स्वच्छता करण्याकरिता नवीन कंत्राटदाराकडून विशेष केमिकल वापरण्यात येत आहे. यामुळे गाडीची स्वच्छता खूप चांगली होत आहे. (सोबत फोटो जोडले आहेत).  प्रवासी सुविधेत वाढ करण्याकरिता अगावू मनुष्यबळा सोबतच प्रवाशांना लागणाऱ्या वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, या करिता विशेष खरेदी करण्यात आली आहे.प्रवास सुरु झाल्यानंतर रेल्वे डब्यामध्ये वारंवार स्वच्छते करिता ऑनबोर्ड हावूस कीपिंग (ओ.बी.एच.एस.) ची सुविधा हि पुरवण्यात आली आहे.   ओ.बी.एच.एस. कर्मचार्याचे काय कार्य असते हे दर्शवणारे बोर्ड गाडीच्या प्रत्येक डब्यामध्ये लावण्यात आले आहेत. , तसेच जर प्रवासी उपलब्ध सुविधे विषयी / स्वच्छते विषयी समाधानी नसल्यास त्यांनी तक्रार करावाचा नंबर सुद्धा त्या बोर्ड वर छापला आहे.तसेच या गाडीमध्ये प्रवासादरम्यान प्रवाशांकडून फीड बेक फोर्म भरून घेतला जात आहे. या फॉर्म मध्ये बहुतांश प्रवाशी समाधानी आहेत. बहुतांश प्रवाशांनी स्वच्छते ला उत्कृष्ठ तसेच खूप चांगला-व्हेरी गुड  असे ग्रेड दिले आहेत. सोबत काही फीड बेक फोर्म जोडले आहेत.No comments:

Post a Comment

Pages