राऊतखेडा येथे ग्रा.पं निवडणुकीची रणधुमाळी सुरु . - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 26 December 2020

राऊतखेडा येथे ग्रा.पं निवडणुकीची रणधुमाळी सुरु .


नांदेड (प्रशांत बारादे) :- कंधार तालुक्यातील बारुळपासुन ३ कि.मी अंतरावर असलेल्या राऊतखेडा येथील  ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे परंतु सामान्य मतदार हा शासनाच्या विविध योजना व भौतिक सुविधापासुन वंचित असल्याची ओरड ग्रामस्थाकंडुन ऐकावयास मिळत आहे .

               राऊतखेडा या गावाची लोकसंख्या  हजाराच्या आसपास आहे येथील वार्ड संख्या ३ असुन सदस्य संख्या ७ आहे.या गावात लिंगायत तथा मराठा समाजाचे वर्चस्व आहे.त्या पाठोपाठ इतर समाजही आहे .गावातील जिल्हा परिषद शाळा ही पहिली पासुन सातवी पर्यत आहे तर कंधार तालुक्यातील एका मातब्बर नेत्यांची उच्चप्राथमिक शाळा हि दहावी पर्यत आहे .गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पण आरोग्य केंद्राच्या सुविधा ह्या गावातील नागरिकांपासुन कोसो दुर आहेत .स्मशानभुमी अधाप बांधलेली नाही व शासनाच्या विविध योजना ह्या गावकय्रांन पर्यत पोहचलेल्या नाहीत तरीही अशा परिस्थितीत पण ग्रामस्थ गुण्यागोविदांने येथे राहत आहेत . गावातील एकमेकांचे संबध व जातीय समिकरण यावर बय्राच गोष्टी अवलंबून असतात त्याच दुष्टीने पॕनल उभा केले जात आहेत .जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणूकीत एकमेकांच्या विरोधी प्रचार करणारे आपआपले गट तट बाजुला ठेऊन पॕनल तयार करत असल्याचे दिसुन येत आहे व भर थंडित पण प्रचार गरमावत आहे व सरपंच पदाचे आरक्षण जरी निवडणूकीनंतर सुटत असले तरी

गावातील दिग्गजांची व नवतरुणांची पणाला लागली आहे. तरुण-वर्ग या ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होत असल्याने राजकीय गणिते बिघडण्याची व ऐन थंडीच्या  महिन्यात वातावरण तापण्याची व  निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत  आहे .कार्यकर्त्यांना खुश व समाधानी ठेवण्यासाठी पॕनल प्रमुखाच्या खिशाला काञी लागत आहे .आजही गावामध्ये रस्ते,विज,पाणी व शिक्षण , शासनाच्या विविध योजना  सोडविण्यासाठी गाव पुढाऱ्यांना यश आले नाही व या सारखे अनेक प्रश्न अपूर्ण आहेत म्हणुन  सर्व राऊतखेडा येथील शिक्षित व गावकय्रानी एकञ येऊन गावचा विकासभिमुख नेतृत्व शोधणे हि एक संधी आहे .

( रस्ते ,विज पाणी,शिक्षणासह शासनाच्या विविध योजना गावपातळीवर अपूर्ण आहेत )

No comments:

Post a Comment

Pages