आंबेडकरवादी तरुणांच्या वतीने मनुस्मृति व शेतकरी विरोधी कृषी कायद्याचे हडको नविन येथे दहन दहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 December 2020

आंबेडकरवादी तरुणांच्या वतीने मनुस्मृति व शेतकरी विरोधी कृषी कायद्याचे हडको नविन येथे दहन दहन

नांदेड :- हडको नविन नांदेड येथे आंबेडकरवादी तरुणांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मानवताविरोधी,स्त्री विरोधी मनुस्मृति ग्रंथ जाळून २६ नोव्हेंबर १९४९ रोजी समता, बंधुता आणि स्वातंत्र्य मिळवून देणार भारतीय संविधान अंमलात आणले.व अत्ता

त्याच पद्धतिने मोदी सरकारने लादलेला शेतकरी विरोधी कृषीकायदा, "मनुस्मृति दहन" दिनाच्या दिवशी हा काळा कृषी कायदा जाळून या बिलाचा व मनुस्मृतिचा विरोध करण्यात आला. यावेळी मनुस्मृति व शेतकरी विरोधी कृषी कायद्याचे दहन करण्यात आले.यावेळी सम्राट आढाव, कैलास खानजोडे, श्रेयस तायडे,अजय जोगदंड व आंबेडकरवादी तरुण  उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages