वंचितच्यावतीने सोलापुरात भारतीय स्त्री मुक्ती परिषद संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 December 2020

वंचितच्यावतीने सोलापुरात भारतीय स्त्री मुक्ती परिषद संपन्न

 

 सोलापूर -:  25 डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला. ह्या निमित्ताने शिवस्मारक भवन, शिंदे चौक येथे महिला आघाडीच्या वतीने भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी  प्रमुख पाहुण्यांचे हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वंचित बहुजन आघाडीच्या  प्रा. अंजनाताई गायकवाड  भुषविले  प्रमुख वक्ते म्हणून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते दिशा पिंकी शेख, डॉ. ज्योत्स्नाताई कोरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा अध्यक्षा धम्मरक्षिता कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते दिशा पिंकी शेख म्हणाले,आजही महिलांची सर्व क्षेत्रात उपेक्षा होत आहे. राजकारणात महिलांना पुर्ण स्वातंत्र्य नाही. त्यांच्याऐवजी त्यांचे पतीच कारभार पाहतात. महिलांना सर्वसाधारण जागेवरून आजही निवडणूकीत उभे करण्यास पुरुष मानसिकता तयार नाही. घरांमध्येही निर्णय प्रक्रियेत महिलांना विचारले जात नाही. ही शोकांतिका आहे. ती आपण यापुढे बंद केले पाहिजे. महिलांचा सन्मान केला पाहिजे.. डॉ. ज्योत्स्नाताई कोरे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली व महिलांनी सकस आहार घेतला पाहिजे. प्रथम पुरुषांनी भोजन केल्यानंतर भोजन करणे ही वाईट प्रथा आहे. महिला निरोगी तर कुटुंब निरोगी राहिल. वंचित बहुजन आघाडीचे गटनेते तथा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मनुस्मृती ने स्त्रियांचे हक्क डावलले होते. किंबहुना स्त्रियांना कसलेच अधिकार नव्हते. चुल व मुल एवढेच त्यांचे कार्य होते. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करुन महिलांना स्वतंत्र केले. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून समस्त भारतीय महिलांना हक्क व अधिकार दिले आहे. यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. महिलांच्या सक्षमीकरणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान फार मोठे आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षा धम्मरक्षीता कांबळे यांनी बौद्धकालीन महान स्त्रियांची माहिती सांगितली.यावेळी नगरसेवका ज्योतीताई बमगोंडे नगरसेवक गणेश पुजारी  मंदाताई शिंगे सारिका वाघमारे, मुक्ताताई बनसोडे, फुलाताई काटे सरूबाई सावंत उषाबाई कांबळे सीमा सर्जे सोनाली सावंत हिराबाई नागटिळक चित्रकला बनसोडे पुनम मसलखांब नसीमा मणियार राधिका जावीर उर्मिला मसलखांब  जिल्हा अध्यक्ष नाना कदम, उपाध्यक्ष अविनाश भडकुंबे, संघटक शिवाजी बनसोडे, महासचिव जावेद पटेल कोषाध्यक्ष बबन शिंदे  रवि थोरात,अनिरुद्ध वाघमारे विद्वत सभेचे जिल्हा अध्यक्ष शाम शिंगे  चाचा सोनवणे विनोद इंगळे श्रीकांत बनसोडे  सूरज गायकवाड, महेश निकंबे यादि कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages