केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा विभागीय बैठकांद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 25 December 2020

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांचा राज्यव्यापी दौरा विभागीय बैठकांद्वारे रिपब्लिकन पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेणारमुंबई दि. 26 - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले उद्या दि. 27 डिसेंबर पासून राज्यव्यापी दौरा करणार असून पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र ; मराठवाडा ; कोकण आणि ठाणे  या विभागांची विभागनिहाय बैठक घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या संघटनात्मक बांधणी;स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील कामगिरी आणि पक्ष सदस्य नोंदणीचा आढावा घेणार आहेत. या विभागीय  बैठकांमध्ये पहिली बैठक रिपाइं च्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक  उद्या दि. 27 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता  पुण्यातील सदाशिव पेठेतील  नवीपेठ येथील पत्रकार भवन च्या सभागृहात होणार असून त्यास रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. 


रिपब्लिकन पक्षाची सदस्य नोंदणी येत्या 10 जानेवारी पूर्वी पूर्ण करून  येत्या 26 जानेवारी पर्यंत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका घेऊन अहवाल निवडणूक आयोगाला सादर करायचा आहे. त्यासाठी लवकर शिस्तपूर्ण सदस्य नोंदणी गांभीर्याने करावी.जो सदस्य नोंदणी करणार नाही त्याला रिपाइं मध्ये स्थान राहणार नाही असा इशारा ना. रामदास आठवले यांनी रिपाइं च्या मुंबई विभागीय बैठकीत नुकताच दिला आहे.रिपाइं च्या मुंबई आणि विदर्भ विभागाच्या बैठकांना ना रामदास आठवलेंनी दि. 12 आणि 13 डिसेंबर का मार्गदर्शन केले होते. आता उद्या दि. 27 डिसेंबर रोजी पुण्यात  पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक होत असून त्यानंतर दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता रिपाइं च्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक शिर्डी येथील  हॉटेल साई गोल्ड; नगर मनमाड महामार्ग; तालुका राहाता  जिल्हा अहमदनगर येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर 

दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता रिपाइं  मराठवाडा विभागाची बैठक मौलाना आझाद सेंटर टीव्ही सेंटर रोड; औरंगाबाद येथे घेण्यात येणार आहे. त्यानंतर

 दि. 30 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता  रिपाइं च्या कोकण विभागाची बैठक अश्विता फॅमिली रेस्टॉरंट;  प्लॉट नं 20 ; मोरेश्वर पार्क; सेक्टर 18 ; कामोठे; पनवेल  येथे होणार आहे. त्यानंतर 


रिपब्लिकन पक्षाच्या ठाणे पालघर विभागाची बैठक येत्या दि. 3 जानेवारी 2021 रोजी दुपारी 1 वाजता सायलंट रिसॉर्ट ; मनोर जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आली असून सर्व विभागीय बैठकांना ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. 


              

No comments:

Post a Comment

Pages