पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी आणि 'प्रबोधन माध्यम' यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे 'डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२०' जाहीर झाले आहेत.
माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे, बीव्हीजी इंडिया लिमिटेड चे संस्थापक हणमंत गायकवाड , महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष जे के सराफ, अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, घटस्फोट रोखण्यासाठी समुपदेशनाचे काम करणारे अॅड. समीर शेख यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’साठी करण्यात आली आहे.संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ,आझम कॅम्पस परिवारातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी प्रा.रणजित घोगले,डॉ. जालिस अहमद यांची निवड करण्यात आली आहे.
‘डॉ. पी. ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान २०२० चे वितरण खा. अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये सोमवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संस्थेचे सचिव डॉ. लतीफ मगदूम हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी डॉ.पी. ए. इनामदार यांचा ७६ वा वाढदिवस असून, सन्मानाचे बारावे वर्ष आहे. रोख रक्कम,सन्मानचिन्ह,शाल,पुष्पगुच्छ असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment