आंबेडकरी क्रांती दलाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

आंबेडकरी क्रांती दलाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर

 मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी इंदू मिल समोरील एम.टी.एन.एल टेलिफोन हाऊस या ठिकाणी एम.टी.एन.एल./एस.सी./एस.टी./ओबीसी बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या संयोगाने रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करत अनेक अनुयायांनी घरीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. दरवर्षी महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची प्रचंड गर्दी असते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे ही गर्दी रविवारी दिसून आली नाही.


कोरोना पार्श्वभूमीवर यंदा राज्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होवून युवकांनीही मोठ्या प्रमाणावर रक्तदानाद्वारे डॉ. आंबेडकरांना अभिवादन केले.


आंबेडकरी क्रांती दलाच्या सहकार्याने रक्तदान शिबिर 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी इंदू मिल समोरील एम.टी.एन.एल टेलिफोन हाऊस या ठिकाणी  रक्तदान शिबिरांचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदात्यांनी सहभाग घेऊन बाबासाहेबांना खऱ्या अर्थी मानवंदना दिली होती.



कोरोना महामारीमुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेऊन आपण ही समाजाच देण लागतो या सामाजिक भावनेतून आम्ही एम.टी.एन.एल./एस.सी./एस.टी./ओबीसी बुद्धिस्ट वेलफेअर असोसिएशन मुंबई यांच्या संयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यास उत्तम प्रतिसाद लाभला. आणि यंदा हीच आमच्याकडून  बाबासाहेबांना अनोखी आदारांजली होती.

- विक्रांत उनवाने (आंबेडकरी क्रांती दल)



दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो अनुयायी जमतात. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं. कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा भासत असून रक्तदान करण्याचं आवाहन केलं जातंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावं, असं आवाहन करत आहेत. त्याच अनुषंगाने बाबासाहेबांना अभिवादन म्हणून आम्ही आज रक्तदान केलं.

- अक्षय पवार (रक्तदाता)



No comments:

Post a Comment

Pages