रक्तदान शिबीर, एक पेन व एक वही वाटप करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

रक्तदान शिबीर, एक पेन व एक वही वाटप करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरानांदेड:

सिडको येथे राहुलनगर भागात दीक्षा बौद्ध विहार व हिराबाई सेवाभावी संस्था च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 64 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड मनपा चे नगरसेवक श्रीनिवास जाधव हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्हा नियोजन मंडळ सदस्य उपेंद्र तायडे हे होते व या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हाटकर, प्रा. अनंद घोडवाडीकर, प्रा. राहुल पुंडगे, प्रा. युगंधर जामधाडे,विद्यार्थी नेते हणमंत कंधारकर, धम्मा डोंगरे, डॉ. वसंत शिरसे, प्रविण चावरे, बंडू सोनवणे, प्रेमदास वाघमारे, शाहीर बापूराव जमदाडे, ई ची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, सामुदायिक त्रिशरण व पंचशील गाथा घेण्यात आली. व कु. अनिशा दोडके हिने गीतांच्या माध्यमातून आदरांजली वाहिली नंतर मान्यवरांच्या हस्ते एक वही, एक पेन वाटप करण्यात आले व रक्तदात्यानि रक्तदान करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव पदमने, यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. शशिकांत हाटकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश खंदारे, भगवान जोगदंड, गौतम थोरात, विशाल नरवाडे देविदास गायकवाड ई ने परिश्रम घेतले.No comments:

Post a Comment

Pages