भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास --------बेमुदत आंदोलन छेडणार - नसोसवायएफ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 December 2020

भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास --------बेमुदत आंदोलन छेडणार - नसोसवायएफ
नांदेड : भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम येत्या आठ दिवसात राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास बेमुदत आंदोलन छेडणारा असल्याचे नसोसवायएफ या विद्यार्थी संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.शै.वर्ष २०१९-२० च्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यंत भारत सरकार शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम जमा झालेली नाही, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम अद्याप पर्यंत जमा झालेली नाही. मा. महोदय आपणास अवगत असेल की, भारत सरकार शिष्यवृत्ती व स्वाधार या दोन शिष्यवृत्यांच्या माध्यमातून राज्याने अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना संविधानाच्या धोरणानुसार शैक्षणिक संवर्धनासाठी अश्वस्त केले होते पण २०१९-२० शै.वर्ष संपल्या नंतरही या शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही, यातून राज्य सरकारची ही भुमिका ही मागासवर्गीय शैक्षणिक धोरणा विरोधात दिसुन येते.

शैक्षणिक वर्ष संपून दूसरे वर्ष लागले तरी अद्यापही काही विद्यार्थ्यांच्या खात्यात भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम जमा न झाल्याने विध्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीला समोर जावे लागत असून पुढील शिक्षण घेणे अवघड जात आहे.त्यामुळे येत्या आठ दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात संबंधित रक्कम जमा न झाल्यास दि.२५ डिसंबर पासून नांदेड समाज कल्याण कार्यालयासमोर कोव्हिड-१ च्या नियमावलीचे पालन करून बेमुदत आंदोलन छेड़णार असा इशारा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त, नांदेड यांच्या मार्फत पुणे समाज कल्याण आयुक्तल्यास आज दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.यावेळी नसोसवायफ विध्यार्थी संघटनेचे राज्य प्रवक्ता प्रा.सतिश वागरे, मराठवाडा संघटक प्रकाश दिपके,जिल्हा प्रभारी संदीप जोंधळे, सचिव अक्षय कांबळे,जिल्हा उपाध्यक्ष सुजय पाटील,प्रसिद्धी प्रमुख शुभम दिग्रसकर, जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे, चंद्रकांत खिराडे यासह अन्यजण उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages