दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी ‘महाशरद’ पोर्टल राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्यासाठी सुविधा नोंदणीसाठी www.mahasharad.in संकेतस्थळ उपलब्ध - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 15 December 2020

दिव्यांगांच्या सुगम्यतेसाठी ‘महाशरद’ पोर्टल राज्यातील दिव्यांगांसाठी सहाय्य उपलब्ध होण्यासाठी सुविधा नोंदणीसाठी www.mahasharad.in संकेतस्थळ उपलब्ध


अमरावती :    दिव्यांगांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. त्याचवेळी समाजामध्ये दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र, या दोघांमध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या सहाय्यक साधनांची कमतरता जाणवते. हा दुवा साधण्यासाठी राज्य शासनाने ‘महाशरद’ नावाचे वेब बेस्ड पोर्टल कार्यान्वित केले आहे.


      दिव्यांगाना सुविधांसाठी शरद (सिस्टीम फॉर हेल्थ अँड रिहॅबिलेटेशन असिस्टन्स फॉर दिव्यांग) हे अभियान दि. 12 डिसेंबर, 2020 पासून सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यान्वित पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींनी तसेच दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करु इच्छिणाऱ्या दानशुर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील दिव्यांगांना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे व त्यांना सुगम्यता प्राप्त व्हावी यासाठी विविध सहाय्यक उपकरणांची आवश्यकता असते. जेणेकरून ते त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करू शकतील व जनसामान्याप्रमाणे जीवन जगू शकतील. त्यांना त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करण्यासाठी कोणत्या सहाय्यक उपकरणांची आवश्यकता आहे हे जाणून घेण्यासाठी, आवश्यक ती वैद्यकीय चाचणी करून घेणे व त्याआधारे सहाय्यक उपकरणे निश्चित करणे आवश्यक आहे, असे केल्यानंतरही मर्यादित साधनसंपत्तीअभावी त्याची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्याचवेळी समाजामध्ये दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना या दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधनांचा पुरवठा करू इच्छितात. मात्र, या दोघांमध्ये दुवा साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या सहाय्यक साधनांची कमतरता जाणवते. हा दुवा साधण्यासाठी एक विश्वासाधारित व्यासपीठ निर्माण करण्यासाठी राज्य शासनाने ‘महाशरद’ नावाचे पोर्टल सुरु केले आहे.


        केंद्र शासनाने ‘दिव्यांग व्यक्तींचा हक्काचा कायदा-2016’ अंमलात आणला आहे. या कायद्यातील कलम 2 (झेडसी) या तरतुदीनुसार दिव्यांगत्वाचे 21 प्रकार दिलेले आहेत. देश पातळीवरील शेवटच्या जणगणनेवेळी दिव्यांगत्वाच्या सहा प्रकाराची तरतूद होती. 2016 च्या कायद्यात 21 प्रकारांची तरतूद केल्याने त्यानुसार  अद्ययावत माहिती उपलब्ध करुन घेणे आवश्यक होते. दिव्यांग व्यक्तींमध्ये जनजागृती करून माहिती उपलब्ध करण्यासाठी व या दिव्यांगांना दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना यांच्याकडून मदत मिळवून देणे व या दोहोंमध्ये दुवा साधण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावे म्हणून पोर्टलव्दारे अभियान राबविण्यात येणार आहे.


  2016 च्या कायद्यातील तरतूदीनुसार 21 प्रकारांत अंतर्भूत होणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्या दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार आवश्यक वैद्यकीय चाचणी व सहाय्यक उपकरण याची नोंदणी www.mahasharad.in या वेबपोर्टलवर करावी.  या पोर्टलवर दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करू इच्छिणाऱ्या दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना यांनाही नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले व्यासपीठ हे विश्वास आधारीत (ट्रस्ट बेस्ड) असून नोंदणी करणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती व दानशूर व्यक्ती हे दोघेही या व्यासपीठाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधू शकतील. हे अभियान हे सुरूवातीच्या कालखंडात एक वर्षाच्या कालावधीचे असेल.


       या अभियानात सहभागी होण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा व राज्यातील दिव्यांगांसाठी असलेल्या सोयीसवलतीचा लाभ घेण्यास पात्र असावा. लाभार्थ्याकडे दिव्यांगत्वाचे किमान 40 टक्के प्रमाण असलेले जिल्हा शल्य चिकित्सक/सक्षम प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले SADM/UDID या प्रणालीव्दारे प्राप्त प्रमाणपत्र असावे. बौध्दीक दिव्यांगता लाभार्थ्याच्या बाबतीत त्याचे कायदेशीर पालक अर्ज करण्यास सक्षम असतील. लाभार्थ्यांनी www.mahasharad.in या वेबपोर्टलवर जावून माहिती भरणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांची निवड करताना जास्त दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना प्रथम प्राधान्य दिले जाईल. त्यानुसार लाभार्थी निवडीचा क्रम हा अतितीव्र दिव्यांगत्व ते कमी दिव्यांगत्व या क्रमाने राहील अथवा दानशूर व्यक्ती ज्या दिव्यांगांना निवडेल त्याप्रमाणे राहील. पुण्याचे दिव्यांग कल्याण आयुक्त व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई हे संयुक्तपणे हे अभियान राबवतील.


No comments:

Post a Comment

Pages