रिपब्लिकन एम्प्लॉएस फेडरेशनची स्थापना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

रिपब्लिकन एम्प्लॉएस फेडरेशनची स्थापना

चंद्रपूर : रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन (इंडिया)च्या विद्यमाने नुकतीच रिपब्लिकन एम्प्लॉएस फेडरेशनची स्थापना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे युवा नेतृत्व राजस प्रवीण खोब्रागडे यांच्या पुढाकाराने करण्यात आली. रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन सातत्याने विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्न मार्गी काढण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याच बरोबर सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे आणि विविध समस्यांचा पाठपुरावा करण्यात नेहमीच अग्रेसर राहत आले आहे. 


याच युवा  पिढीसाठी काही नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा निर्धार करून रिपब्लिकन एम्प्लॉएस फेडरेशनची स्थापना करणात आली त्यामाध्यमातून मागासवर्गीय आणि उपेक्षित वर्गातील युवक-युवतींना रोजगाच्या संधी उपलब्ध करून देणे, विविध क्षेत्रातील जीवन उपयोगी उपक्रमाची माहिती पोहचविणे, एकंदरीत मागासवर्गीय युवकांची सामाजिक व आर्थिक उन्नती झाली पाहिजे म्हणून सर्वतोपरी मदत व्हावी यासाठी या फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे तरी अधिकाधिक युवकांनी या उपक्रमात सोबत यावे असे आवाहन करण्यात आली आहे.


विशेष म्हणजे आजचा रिपब्लिकन एम्प्लॉएस फेडरेशन स्थापनेचा कार्यक्रम डिजिटल झूम अँप च्या माध्यमातून घेण्यात आला. प्रसंगी अनुप मानकर, लुम्बिनी अलोने, कल्याणी बोकावर, अश्लेशा शेंडे, नयन अलोने, वामनराव चंद्रिकापुरे, करण मेश्राम, स्वप्निल बारसागडे, हेंमत निखाडे, संकेत बाबोडकर, कुणाल भावे यांची प्रमुख उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages