आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब नांदेडच्या विशाल MBBS साठी पात्र डॉ.कल्याणकर यांचा प्रवेश फीस साठी मदतीचा हात.... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

आई- वडिलांचे छत्र हरपलेल्या अत्यंत गरीब नांदेडच्या विशाल MBBS साठी पात्र डॉ.कल्याणकर यांचा प्रवेश फीस साठी मदतीचा हात....


नांदेड :

अवघे ३ वर्षाचे वय असतानाच विशाल उत्तमराव कठारे

( रा. तडखेल ता. देगलूर जि. नांदेड) यांची आई वारली... थोड्याच दिवसात   वडिलांचेही निधन झाले. दोघा मातापित्यांचे छत्र हरवल्याने व घरची परिस्थिती फारच हलाखीची असल्याने त्याने खूप हालअपेष्टा सहन करत इथपर्यंतचा  प्रवास केला.आजी  द्रोपदा हनुमंत कठारे (वय ७०) यांनी विशालचा मोलमजुरी करून सांभाळ केला.

विशालच्या डोळ्यात एक स्वप्न होते की, आपल्याला मोठं व्हायचं... त्यासाठी त्यांने प्रचंड मेहनत घेण्याचं ठरवलं. आजीच्या तुटपुंज्या मदतीवर त्यांनं नांदेड गाठलं

 दहावीला ९० टक्के गुण घेतले व पुढे बारावीत ७६ टक्के गुण घेऊन त्यानं डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं. परिस्थिती तशी नाजूक होती. नांदेडला फक्त एक वेळेस मेसचे जेवण करून त्यांनं अभ्यास केला.  त्याननं धीर सोडला नाही. प्रचंड कष्ट करून अभ्यास केला.याचे फलित म्हणून त्याला नीट परीक्षेत ४१० गुण मिळाले व त्याचा नंबर मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेज (जे जे हॉस्पिटल) येथे MBBS साठी लागला. मात्र MBBS च्या  ॲडमिशनसाठी ११००० रुपयांचा DD काढण्याची ऐपत सुद्धा विशालची नाहीये. त्यासाठी त्यांनं नांदेडमध्ये अनेक जणांची भेट घेतली व मदतीची अनेकांकडून अपेक्षा केली. स्वतः ३-४ हजार रुपये कसेबसे जमवले, परंतु अकरा हजार रुपये फीस व मुंबईला जाणे - येणे यासाठी काही रक्कम असा बारा-पंधरा हजारांचा खर्च त्याला  लागणार असल्याने.त्यासाठी त्यांला कोणीतरी प्रा. डॉ. नागेश कल्याणकर हे तुला मदत करतील, त्यांच्याकडे जा,असे सांगितले. त्याने नागेश कल्याणकर सरांना  भेटून आपली सर्व हकीकत सांगितली. सरांनी त्यांला  बोलावून मदत करण्याचे आश्वासन दिले.

 अशा गरजू व होतकरू विद्यार्थ्याला प्रा. नागेश कल्याणकर  यांनी बबन जोगदंड  यांच्या हस्ते   ८००० रुपयांची मदत  प्रवेश फीस भरण्यासाठी केली.

No comments:

Post a Comment

Pages