"डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे बाबासाहेबांचे भाषण व लेखन खंडांचे प्रकाशन तसेच पुनर्मुद्रण करण्याकरिता मा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे बाबासाहेबांचे भाषण व लेखन खंडांचे प्रकाशन तसेच पुनर्मुद्रण करण्याकरिता मा. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना निवेदन

ननागपुर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व लेखन खंड अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या साहित्याची जाण संपूर्ण जगाला झालेली आहे. "भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने या साहित्य प्रकाशनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आहे." त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे तर्फे "सामाजिक न्याय व सबळीकरण मंत्रालय, भारत सरकार या खात्याचे राज्यमंत्री माननीय रामदास आठवले यांना निवेदन देण्यात आले." यामध्ये स्पष्टपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रकाशित व अप्रकाशित साहित्य तसेच ज्या खंडांचे पुनर्मुद्रण करायचे आहेत ते प्रकाशित करण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्याप्रित्यर्थ प्रस्तुत विषयावर आधारित यांचेशी चर्चा करण्यात आली. "त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण व लेखन खंड प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले", तसेच या कमिटीचे ते स्वतः सुकाणूधारक आणि "एक सदस्य असल्याने त्यांनी याकडे लक्ष देण्याची आणि कार्य करण्याची ग्वाही दिली."

     प्रस्तुत निवेदन डॉ. महेश बन्सोड आणि डॉ. अमित झपाटे यांनी तयार केले. तसेच ते निवेदन देण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भूषण वाघमारे, डॉ. महेश बन्सोड, डॉ. अमित झपाटे, डॉ. घपेश ढवळे, एड. प्रफुल्ल अंबादे, प्रकाश वाघमारे, राकेश धनविजय, मंगेश भैसारे आणि इतर सदस्य उपस्थित होते. No comments:

Post a Comment

Pages