विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे भव्य निदर्शने - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे भव्य निदर्शनेआज विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रा प्रकाश भाऊ इंगळे यांच्या नेतृत्वात भव्य निदर्शने करण्यात आली.

तसेच प्र कुलगुरू श्याम शिरसाठ सर यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात विद्यार्थ्यांच्या विविध  प्रश्ना संदर्भात मागणी करण्यात आली.निवेदन खालील प्रमुख मागण्या:

1.सर्व विभागाच्या एम.फिल च्या जागा दरवर्षी प्रमाणे 20 जागा पूर्ववत ठेवण्यात याव्यात.

2.नुकत्याच विविध अभ्यासक्रमाच्या निकाल जाहीर झाला असून त्यात ऑनलाईन व ऑफलाइन घेतलेल्या परीक्षेच्या निकालात अनेक गोंधळ झाला असून अनेक विद्यार्थी हे त्यामुळे मानसिक तणावात आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यना सरसकट पास करण्यात यावे.

3.विद्यापीठात हॉस्टेल त्वरित सुरू करण्यात यावे.

4.संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक भेटत नाही त्यांना विद्यापीठाने तात्काळ मार्गदर्शक उपलब्ध करून देण्यात यावे.

5.विद्यापीठातील ग्रंथालय सुरू करण्यात यावे.या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात यावे अन्यथा तीव्र असा आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला

यावेळी मोठ्या संख्येने सम्यकचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.  आंदोलनाचे नेतृत्व प्रा.प्रकाश दादा इंगळे यांनी केलं

 यावेळी सम्यकचे Adv. नागसेन वानखेदे,अनिल दिपके,राहुल खंदारे,अमोल घुगे,सुनील वाघमारे,रवींद्र गवई,शहराध्यक्ष संकेत कांबळे,रोहित जोगदंड, ऋषि कांबळे,सिद्धार्थ कांबळे,जयश्री शिर्के,विकास तुरेराव,अक्षय देहाडे,सागर दोडपकर,गोलू गवई,वोनोद आघाव,शैलेश चाबुकस्वार, हर्षापाल खाडे,सोनाली गवईNo comments:

Post a Comment

Pages