क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी रामजी कांबळे यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 29 December 2020

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी रामजी कांबळे यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन

 किनवट, दि.२९: स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन मातोश्री कमलताई ठमके सभागृह, गोकुंदा येथे  ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११:३० वाजता  रामजी कांबळे यांच्या पाच कविता संग्रहाचे प्रकाशन होणार आहे .

या प्रकाशन सोहळ्यास अभियंता प्रशांत ठमके (भारतीय बौद्ध महासभा तालुकाध्यक्ष, किनवट), डॉ. अशोक गायकवाड (राष्ट्रीय सरचिटणीस अ.भा. बौद्ध उपासक संघ, औरंगाबाद), गझलकार मधु बावलकर अदिलाबाद, अभि. भीमराव हटकर नांदेड, डॉ. अंबादास कांबळे सरचिटणीस अ.भा. बौद्ध उपासक संघ म. रा .), ॲड. मिलींद सर्पे, उत्तम कानिंदे , महेंद्र नरवाडे, रमेश मुनेश्वर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. प्रारंभी प्रा. सुरेश पाटील , अनिल उमरे व संच यांचा बुद्ध भीमवाणी प्रबोधन गीतांचा कार्यक्रम  होणार आहे .

No comments:

Post a Comment

Pages