शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 29 December 2020

शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 औरंगाबाद दि. 29 - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करतात त्यांना ही रिपब्लिकन नाव घ्यायला लाज वाटते म्हणून  त्यांनी आपल्या पक्षातून रिपब्लिकन चे नाव पुसून टाकले आहे. त्यांना दाखवुन द्या की डॉ बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना असणारा रिपब्लिकन पक्ष आम्हाला प्राणापेक्षा प्यारा आहे. देशभरात रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा आम्ही मजबूत करीत आहोत. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी रिपब्लिकन आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना रामदास आठवले यांनी केले. 

औरंगाबाद येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद  रिसर्च सेंटर हॉल येथे रिपाइं च्या मराठवाडा   विभागीय बैठकीत ना रामदास आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रिपाइं चे बाबुराव कदम; पप्पू कागदे; नागराज गायकवाड; मिलिंद शेळके;दौलत खरात; राजा ओव्हाळ; दिवाकर माने; एड.ब्राह्मानंद चव्हाण; अरविंद अवसरमल; संजय ठोकळ; विजय मगरे; विजय सोनवणे;बाळकृष्ण इंगळे; डॉ सिद्धार्थ भालेराव;  डॉ.विजय गायकवाड; प्रशांत शेगावकर; राकेश पंडित; पप्पू दोंदे; विनोद निकाळजे;महेंद्र निकाळजे;व्ही एन दाभाडे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 


शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना मांडली.शेड्यूल्ड कास्ट ची संख्या केवळ 16 टक्के असून त्यांच्या बळावर सत्ता  मिळविता येऊ शकत नाही.त्यामुळे शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त करून सर्व जाती धर्मीयांचा सर्वसमावेशक पक्ष म्हणून  रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रिपाइं  केवळ एका जाती धर्माचा पक्ष  नसून आता सर्व जाती पक्ष आहे. जनतेत मिसळून जनतेची कामे करा;जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आंदोलन उभारा ; जनतेचा विश्वास जिंकून रिपब्लिकन पक्ष मजबूत करा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले.


रिपब्लिकन पक्षाची सदस्य मोहीम यशस्वी करा; येत्या दि. 26 जानेवारी पर्यंतच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात रिपाइं चे  50 लाख सदस्य करा असे आवाहन ना रामदास आठवले यांनी केले. रिपाइं कार्यकर्त्यांनी पँथर सारखे आक्रमक व्हावे असे आवाहन ना रामदास आठवले यांनी  यावेळी केले. यावेळी मराठवाड्यातून मोठया संख्येने रिपाइं कार्यकर्ते उपस्थित होते.


   


        

No comments:

Post a Comment

Pages