खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून नवीन अभ्यासक्रमाचा विचार करणार - केंद्रीय मंत्री रिजिजू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 24 December 2020

खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करून नवीन अभ्यासक्रमाचा विचार करणार - केंद्रीय मंत्री रिजिजू

औरंगाबाद : मराठवाड्यातील खेळाडूंमध्ये अधिक क्षमता आहे. ही क्षमता अधिक वृद्धींगत करण्यासाठी औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (साई) येथे जलतरण तलाव, सिंथेटिक हॉकी टर्फचे उद्घाटन आणि तलवारबाजी सभागृहाच्या कोनशिलाचे अनावरण केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्यासह इतर सर्व लोकप्रतनिधींनीची उपस्थिती होती. 

          राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्यामाध्यमातून धनुर्विद्या, मुष्टियुद्ध, भारोत्तोलन, जिम्नॅस्टिक, हॉकी आदी शाखांतून खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. देशात एका राज्यात एक खेळ या धर्तीवर विचार केला जात असताना, औरंगाबादेत मात्र सात क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन दिले जात आहे. औरंगाबाद येथील जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकार बंद करण्यात आला होता, परंतु खासदार इम्तियाज जलील यांनी यशस्वी पाठपुरावा केल्याने या क्रीडा प्रकारास पुर्नमान्यता देण्यात आल्याचे क्रीडा मंत्री रिजिजु यांनी म्हटले. 

         खासदार इम्तियाज जलील यांनी क्रीडा मंत्री रिजिजू यांच्याकडून क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य सहकार्य मिळत असल्याची माहिती देवून औरंगाबाद येथील साईच्या विकासात अधिक भर घालण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. खासदार इम्तियाज जलील यांच्या मागणीचा सकारात्मकपणे विचार करताना याठिकाणी पदविका, पदवी अभ्यासक्रमाचा विचार करणार असल्याचेही केंद्रीय मंत्री रिजिजू म्हणाले.

No comments:

Post a Comment

Pages