मुंबई दि. 6 - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन दुःखाचा दिन असला तरी तेवढाच आमच्या साठी प्रेरणा दिन आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आमची शक्ती आहेत. त्यांचे व्यक्तिमत्व अथांग सागराचे रूप आहे. शांती चे स्तूप आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरच आमची प्रेरणा आहेत असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. वडाळा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त पीपल्स एज्युकेश सोसायटीच्या डॉ.आंबेडकर कॉलेज मध्ये आयोजित अभिवादन सभेत ना रामदास आठवले बोलत होते. यावेळी सिद्धार्थ हॉस्टेल ची भव्य इमारत लवकरच उभारण्यात येईल.त्यात विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासाची व्यवस्था करण्यात येईल अशी घोषणा ना रामदास आठवले यांनी केली. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ना आठवले म्हणाले.यावेळी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष म्हणून ना रामदास आठवले यांचे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला . यावेळी डॉ आंबेडकर कॉलेज चे प्रिन्सिपल सिद्धार्थ कांबळे;जयमंगल धनराज;विश्वस्त अशोक तळवटकर; वाघमारे; चंद्रशेखर कांबळे; संजय खैरे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment