गाडगेबाबांनी कीर्तनातून लोकांची मने स्वच्छ केलीत... अॅड. बाळासाहेब आंबेडकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 20 December 2020

गाडगेबाबांनी कीर्तनातून लोकांची मने स्वच्छ केलीत... अॅड. बाळासाहेब आंबेडकरअकोला - स्थानिक ताथोड नगर मोठी उमरी येथे महाराष्ट्र राज्य परीट धोबी समाज अकोला जिल्ह्याच्या वतीने श्री संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे होते, तर प्रमुख पाहुणे बालमुकुंदजी भिरड माजी जिप अध्यक्ष, अॅड. संतोष राहाटे, मनोहर पंजवानी,  शंकरराव गिरे गोपाल भाऊ राऊत ओबीसी नेते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन दांडगे जीवन डिगे मनोज शिरसाट डॉ. सुनील शिराळे पराग गवई सुनील इंगळे आशिष मांगुळकर जॉनी भाई अॅड.  आकाश भगत नितेश कीर्तन निखिल बोरीकर गुणवंत शिरसाट शांतशील गवई  विशाल वानखडे आनंद जंजाळ हे उपस्थित होते. गाडगे महाराजांनी गावागावात जाऊन गावातील साफसफाई करून संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन करून लोकांची मने स्वच्छ केली असे प्रतिपादन बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. तसेच ऍड संतोष राहाटे व बालमुकुंद भिरड यांनी सुद्धा गाडगे महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रस्ताविक शुभम  डहाके यांनी केले, व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव यांनी केले. याचे आयोजन शुभम डहाके रेश्माताई चांदुरकर उल्हास मोकळकर राजूभाऊ मंजुळकर गजानन वरणकार गणेश डहाके सनीभाऊ मंजुळकर हर्षल वरणकार योगेश बुंदले बाळू गवळी चिंचोळकर अजय चांदूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages