वंचित बहुजन आघाडीमचे आंदोलन .... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 17 December 2020

वंचित बहुजन आघाडीमचे आंदोलन ....

नाशिक दि. 17       वंचित बहुजन आघाडी, नाशिकचे जिल्हाध्यक्ष मा. पवन पवार यांच्या नेतृत्वात दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत महाविकास आघाडीने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश तात्काळ काढावा आणि विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत (हमी भाव) मिळण्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद करावी व ती कठोर अंमलात आणावी यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्याचं पद्धतीने रेल्वे खाजगीकरणामुळे शेतीमालाची वाहतूक प्रचंड खर्चिक होईल व सर्वसामान्यांवर वाढीव भावाचे ओझे लादले जाईल याकडे लक्ष देत केंद्राने रेल्वे खाजगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा अश्या अनेक मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या.


प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार, विनय कटारे, उर्मिला गायकवाड, गौतम बागुल  तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मिहीर गजबे, महासचिव निखिल भुजबळ, कोमल पगारे, सायली तालखे, विजय गायकवाड, विशाल येडे, सुरज भालेराव, विजय साळवे, राहुल नेटावदे इ. पदाधिकारी -कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages