राऊतखेडा वासीयांसाठी स्मशान भुमीच नाही पञकार संरक्षण समिती प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे -राऊतखेडकर व गावातील तरुणवर्ग यांची स्मशानभुमी चा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाव्दारे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 16 December 2020

राऊतखेडा वासीयांसाठी स्मशान भुमीच नाही पञकार संरक्षण समिती प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे -राऊतखेडकर व गावातील तरुणवर्ग यांची स्मशानभुमी चा प्रश्न लवकरात-लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदनाव्दारे मागणी




नांदेड :- कंधार तालुका अर्तंगत  मौ.राऊतखेडा हे गाव जरी नांदेड जिल्ह्यातील क्वचित लोकांना माहित असले तरे या गावची लोकसंख्या हजाराच्या वर असुन राऊतखेडा वासीयांना अधापही स्मशानभुमीची जागा उपलब्ध  झाली नाही . या गावातील सर्व गावकरी गुण्यागोविंदाने राहतात .सर्व जण एकमेकांच्या सुखात व दु:खात सहभागी होतात . गावातील सर्व नागरिक शेतीसह अनेक व्यवसायात पारंगत आहेत पण या गावाची कठिण समस्या बनली आहे ती स्मशानभुमी . एखाद्या माणसावर अंतिम संस्कार करावयाचा असेल तर मोकळ्या जागेतच किंवा शेतामध्ये अंतिम संस्कार करावे लागत आहेत हे दुःख फक्त गावकरीच समजून घेऊ शकतात . पावसाळा या रुतुमध्ये प्रेञावर अंतिम संस्कार करणे हे कठिणच आहे व ते विचार न केलेले बरे असे वाटते . प्रशांत बारादे -राऊतखेडकर  व गावातील तरुणवर्गाने मा जिल्हाधिकारी साहेब ,लोहा -कंधार मतदारसंघाचे आमदार श्री श्यामसुंदर शिंदे साहेब यांना निवेव्दनावरे अशी मागणी केली आहे गावातील गावठाण जमिनीवर लवकरात लवकर स्मशानभुमी मंजुर करुन व स्मशानभुमी चे काम लवकरात लवकर पूर्ण करुन राऊतखेडा ग्रामवासीयांचा गंभीर बनलेला स्शमानभुमीचा प्रश्न दुर करुन समस्त गावकय्रांचे दुःख दुर करावे  

  निवेदनावर पञकार संरक्षण समिती प्रसिद्धी प्रमुख प्रशांत बारादे राऊतखेडकर ,सुमित बारादे ,राहुल बारादे ,सदाशिव देशमुख,राजु डिकळे ,गणेश माळेगावे ,हानमंत आगलावे 

स्वप्निल मडके ,मनोज तागमपुरे 

दिनेश कौसल्ये,विशाल गर्जे व

रावसाहेब सूर्यवंशी यांची स्वाक्षरी आहे.

No comments:

Post a Comment

Pages