बार्टी संस्थेचा 42 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 22 December 2020

बार्टी संस्थेचा 42 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


 पुुणे :

 दिनांक 22 डिसेंबर 2020 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे या संस्थेचा वर्धापन दिन बार्टीच्या पुणे येथील मुख्यालयात कोरोना काळातील भौतिक अंतराच्या निकषांच्या सर्व नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी मा. श्री ऋषिकेश यशोद, आयुक्त महिला व बालकल्याण आयुक्तालय, पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मा. श्री ऋषिकेश यशोद, आयुक्त,  महिला व बालकल्याण आयुक्तालय, पुणे आणि  मा. श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक, बार्टी, पुणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी   बार्टीचे मा. निबंधक, श्री उमेश घुले,   श्री. मेघराज भाते,  विभाग प्रमुख,  विस्तार सेवा विभाग, डॉक्टर दीप्ती सूर्यवंशी, विभाग प्रमुख, योजना विभाग, आरती डोळस प्रकल्प संचालक, प्रकाशन व प्रसिद्धी विभाग, श्री. प्रशांत बुद्धिवंत, प्रकल्प व्यवस्थापक माहिती व तंत्रज्ञान विभाग, श्री. कुणाल शिरसाठे, प्रकल्प संचालक, कौशल्य विकास विभाग, श्री. हंबीरराव कांबळे, प्रकल्प संचालक, येरवडा व्यवस्थापन व  बार्टीचे इतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 यावेळी बार्टीच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल एक डॉक्युमेंटरी फिल्म सादर करण्यात आली. 

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी  आदर्श कामगार म्हणून   बार्टीतील चतुर्थ श्रेणीतील  कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव  करण्यात आला.  श्रीमती सुनंदा  साळवी,  कार्यालयीन सहाय्यक,  श्री नाना गरजे,  वाहन चालक  आणि श्रीमती  सुमन मस्के,  सफाई कामगार  यांना  आदर्श कामगार  या पुरस्काराने  सन्मानित करण्यात आले.   पुरस्कारार्थीना  भारतीय संविधानाची प्रत  मान्यवरांच्या हस्ते  भेट देण्यात आली.  बार्टीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध सामाजिक विषयांवर आधारित प्रबोधनात्मक व प्रेरणादायी गीतांचे व कवितांचे सादरीकरण करून कार्यक्रमात रंगत भरली. यात श्रीमती कोमल खराटे, सहाय्यक प्रकल्प संचालक, यू. पी.एस.सी. विभाग, जात पडताळणी विभागाच्या संप्रती बडगे, प्रकल्प अधिकारी, श्रीमती प्रज्ञा रणवरे, आस्थापना सहाय्यक, श्रीमती ज्योती झांजरे,प्रकल्प अधिकारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित समूहगीत सादर केले.   श्री.आमिर मुलानी, संशोधन अधिकारी यांनी बेटी बचाव या संकल्पनेवर आधारित प्रेरणादायी गीत गायले, श्री. वाजिद पठाण, अभियंता, यांनी कोरोनामुळे झालेल्या  सामाजिक  परिणामांवर स्वरचित कवितेचे वाचन केले. श्री मारुती मेमाने, कार्यालयीन सहाय्यक यांनी सकारात्मक दृष्टिकोनावर आधारित गीत सादर केले.

 मा. श्री ऋषिकेश यशोद, आयुक्त महिला व बाल कल्याण आयुक्तालय, पुणे यांनी आपल्या भाषणात बार्टीच्या विविध योजना व उपक्रमांबद्दल कौतुक केले आणि पुढील पन्नास वर्षात बार्टी कशी असेल याचे व्हिजन  डॉक्युमेंट तयार करून त्यानुसार वाटचाल होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. 

बार्टीचे मा. महासंचालक, श्री धम्मज्योती गजभिये यांनी बार्टीच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि कार्यकुशलते बद्दल गौरवोद्गार काढले आणि  बार्टीच्या  पुढील उज्वल वाटचाली करिता सांघिकरित्या प्रयत्न करण्यासाठी योगदान देण्याबाबत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवाहन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. दीप्ती सूर्यवंशी, विभाग प्रमुख, योजना विभाग, बार्टी, पुणे यांनी केली. आभार बार्टीचे मा. निबंधक, श्री. उमेश घुले यांनी मानले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन प्रकाशन व प्रसिद्धी विभागाच्या प्रकल्प संचालिका आरती डोळस यांनी पार पाडले.


No comments:

Post a Comment

Pages