मानवी साखळीद्वारे भीमसंदेश देऊन बाबासाहेबांना अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 6 December 2020

मानवी साखळीद्वारे भीमसंदेश देऊन बाबासाहेबांना अभिवादनऔरंगाबाद:

डॉ. बाबासाहेब अमवेदकरांनी दिलेल्या संदेशाचे फलक हातात घेत 'भीमसंदेश मानवी साखळी' करून भीमसैनिकांनी महापरिनिर्वाण दिनी डॉ. आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.रिपब्लिकन विद्यार्थी सेना, मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेयर असोसिएशन व भीमसैनिकांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी (दि.६) मिलकॉर्नर ते भडकल गेट अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  'भीमसंदेश मानवी साखळी' मध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या सर्व संदेशाचे फलक हातात घेऊन भीमसैनिक सहभागी झाले होते. 'जा, आपल्या घराच्या भिंतीवर लिहुन ठेवा की, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनावयाची आहे., शिका- संघटित व्हा, संघर्ष करा' हे संदेश लिहलेल्या भव्य बॅनरने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय 'लक्षात ठेवा तलवारीच्या धारेपेक्षा

लेखणीची धार कायम टिकणार आहे. लेखणीच

सर्वात खतरनाक शस्त्र असून तलवार हातात 

न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा'., 'अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे'., 'तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही'., 'यशस्वी क्रांतीसाठी असंतोष असणे पुरेसे नाही. काय आवश्यक आहे ते न्याय आणि राजकीय आणि सामाजिक अधिकाराचे महत्त्व याची गहन आणि दृढ निश्चयता आवश्यक  आहे'. 'स्त्रियांनी जी प्रगती केली आहे, तिच्या पदवीनुसार मी त्यानुसार समुदायाच्या प्रगतीचे मापन करतो'., ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल. आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल. कारण ज्ञानाशिवाय लढलात तर पराभव निश्चित आहे'., ' सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे'., 'साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते'., 'एखादा खरा प्रियकर ज्या उत्कटेने आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे माझे माझ्या पुस्तकांवर प्रेम आहे'., 'आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग ?'. यासारखे सुमारे १०० संदेशाचे फलक हाती घेऊन भीम सैनिक मानवी साखळीत सहभागी झाले होते. बाबासाहेबांनी लिहिलेल्या संदेशातून समाजाला नवी दिशा मिळावी, या उद्देशाने महापरिनिर्वाणदिनी वैचारिक अभिवादन करण्यात आले. मानवी साखळीत सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, ऍड. अतुल कांबळे, श्रावण गायकवाड,दिनकर ओंकार,शांतीलाल गायकवाड,प्राचार्य सुनील वाकेकर, इंजि.अविनाश कांबळे, महेंद्र तांबे, गुरू कांबळे, सचिन भुईगळ, प्रा.प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, चिरंजीव मनवर, शैलेंद्र म्हस्के, अशोक मगरे, सुनील शिंदे, प्रवीण हिवराळे, सागर प्रधान, दिनेश नवगिरे, सोमु भटकर, राहुल खंडागळे, रवी बोर्डे, स्वप्नील गायकवाड, नितीन साळवे, नितेश भोळे, विशाल इंगोले, अक्षय बनकर, मानव साळवे, कपिल बनकर, दिनेश गवळे, सचिन जगधने, विक्की जगताप, पवन पवार यांच्यासह विविध आंबेडकरी पक्ष संघटनांच्या नेते कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.
No comments:

Post a Comment

Pages