लोक अदालतीमध्ये ५९ प्रकरणे निकाली;१२ लाख,८६हजार,४१ रुपये तडजोडीतून वसूल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

लोक अदालतीमध्ये ५९ प्रकरणे निकाली;१२ लाख,८६हजार,४१ रुपये तडजोडीतून वसूल

किनवट ता.१४ : तालुका विधी सेवा समितीच्या वतीने किनवट न्यायालयाच्या प्रांगणात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ५९ प्रकरणे निकाली निघाली.यात दिवाणी १,फौजदारी ३ व दाखल पूर्व ५५ प्रकरणाचा समावेश होता.तसेच प्रकरणातील तडजोडीतून १२ लाख ८६ हजार ४१ रुपयांची तडजोड रक्कम वसूल झाली. 

  पँनल प्रमुख म्हणून दिवाणी न्यायाधीश जे.आर.पठाण हे,तर सदस्य म्हणून प्राचार्य वि.मा.शिंदे व एड.पंकज गावंडे यांनी काम पाहीले.

  लोक अदालतीमध्ये भारतीय स्टेट बँक, किनवट व सारखणी,महाराष्ट्र ग्रामीण बँक,बोधडी,किनवट,उमरी(बा.)व ईस्लापूर, विद्युत वितरण कंपनी व महेंद्रा फायनान्स ,किनवट यांची प्रकरणे होती.यावेळी न्यायाधीश जे.एन.जाधव,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती यांच्यासह सरकारी वकील अशोक पोटे, अनंत वैद्य,शंकर राठोड, डी.जी.काळे,अरविंद चव्हाण, यशवंत गजभारे,यु.बी.चव्हाण,टी.आर.चव्हाण, बिपिन पवार,गजानन पाटील,सुनील सिरपुरे,सुनिल येरेकार,दिलिप कोट्टावार,के.एम.राठोड,एम.यु.सर्पे(सर्व वकिल),सुभाष दोनकलवार,पोलिस आदी उपस्थित होते.

  यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी एस.एम.चिटमलवार,एल.वाय.मिसलवार,ए.एस.धोटे,एस.व्ही.चटलेवार,बी.ए.घुले,आर.एस.माने,शेख मगदुम व एस.डी.चव्हाण यांनी पुढाकार घेतला.



No comments:

Post a Comment

Pages