रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा परीक्षा नियंत्रकांना घेराव सर्व विद्या शाखांचे निकलातील घोळ दुरुस्त करण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 14 December 2020

रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचा परीक्षा नियंत्रकांना घेराव सर्व विद्या शाखांचे निकलातील घोळ दुरुस्त करण्याची मागणी

औरंगाबाद : राज्यातील कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे विद्यापीठातील पदवी ,पदव्युत्तर च्या लांबणीवर पडलेल्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या परीक्षेदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना वेळेत वेळापत्रक, हॉलतिकीट न मिळाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला शिवाय 10 दिवसात निकाल लावण्याची विद्यापीठाने केलेली घोषणा फसवी निघाली आहे.

सर्वच विद्याशाखेच्या जाहीर करण्यात आलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांचे सर्वच्या सर्व विषय फेल दाखविण्यात आले आहे,ग्रेस पद्धतीचा लाभ देऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा नियम पाळण्यात आला नाही,प्रथम-द्वितीय वर्षाच्या परीक्षार्थींना उत्तीर्ण करण्यासाठीच्या आश्वासनांचा विसर पडला आहे,OMR शीट (उत्तर पत्रिका) स्कॅनिग करताना विद्यार्थ्यांचे केलेले गुणांकन सदोष असल्याने विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली गेला आहे.

अनेक गुणवंत विद्यार्थी गुणांकणाच्या सदोष पद्धतीमुळे अनुत्तीर्ण झाले आहे शैक्षणिक वर्ष उलटून जात असताना अजूनही परीक्षेचा घोळ निस्तारण्यात प्रशासनाला अपयश आलेले आहे.शिवाय निकालामुळे गोंधळात पडलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासन,विद्यापीठ प्रशासन योग्य मार्गदर्शन न करता धुडकावून लावत असल्याने विद्यार्थी हवालदिल झाला आहे.



रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने ह्या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ विद्यार्थ्यांचे सदोष निकाल दुरुस्त करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा,omr शीट मधील सदोष निकालाची पुन्हा पडताळणी करावी,राहिलेले निकाल तात्काळ घोषित करावे,omr शीट वर परीक्षा देण्याची कुठलीच पूर्व तयारी नसल्याने अनेक विद्यार्थी प्रश्न सोडवताना संभ्रमात पडले होते त्यामुळे आलेल्या निकालातून विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावाखाली वावरत आहे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची दाट शक्यता आहे.

तरी तातडीने सदोष निकालाची पडताळणी करून योग्य निकाल लावावा,किमान 50 % विषय उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गास प्रमोट करावे/उत्तीर्ण करावे,अनुपस्थित दाखवलेल्या विद्यार्थ्यांचे उपस्थिती पत्रक मागवून घेऊन विद्यार्थ्यांना होणारा त्रास दूर करावा,उत्तर पत्रिकेवर prn क्रमांक,बैठक क्रमांक नसल्यामुळे उत्तर पत्रिका ओळखता येत नाही अश्या विद्यार्थ्यांची हजेरी तपासून अथवा सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे अश्या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी सचिन निकम,पँथर विद्यार्थी आघाडीचे गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे,गुरू कांबळे,महेंद्र तांबे,प्रवीण हिवराळे,अविनाश कांबळे,प्रबोधन बनसोडे,चिरंजीव मनवर,अविनाश डोंगरे,अक्षय जाधव,अजय रगडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages